
दैनिक चालु वार्ता रत्नागिरी प्रतिनीधी -समिर शिरवडकर
चिपळूण :- खेड येथील माहिती अधिकार कार्यकर्ते रूपेश पवार यांनी दि. १५ ऑगस्ट पासून मुंबई येथील आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू केले होते. या उपोषणाची दखल घेत सहकार मंत्र्यांचे खाजगी सचिव सुधीर राठोड यांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती सहकार राज्यमंत्री मा. पंकज भोयर यांना अवगत केली आहे व या प्रकरणी उचित कारवाईसाठी अग्रेषित करण्यात आले आहे. त्यामुळे लवकरच चिपळूण नागरी पतसंस्थेवर कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या विरोधात रुपेश पवार यांनी मुंबई येथील आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू केले होते. चिपळूण नागरी पतसंस्थेची त्रिसदस्यीय समितीकडून चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली होती. मात्र या समितीचा चौकशी अहवाल अद्याप समोर आलेला नाही. त्यासाठीच रुपेश पवार यांनी उपोषण छेडले होते. पण दरम्यानच्या काळात गणेशोत्सव व सुट्ट्यांचा कालावधी असल्याने काही दिवसांसाठी रुपेश पवार यांनी आपले उपोषण स्थगित केले होते. मात्र पुन्हा दि. २२ ऑगस्ट पासून पुन्हा एकदा रुपेश पवार यांनी आपले उपोषण सुरू केले होते. त्यावेळी सहकार विभागाने आपण पुढील कारवाई लवकर सुरू करू असे लेखी आश्वासन दिल्यामुळे रुपेश पवार यांनी आपले उपोषण स्थगित केले होते. आता त्यांना सहकार विभागाकडून नुकतेच एक पत्र प्राप्त झाले असून या पत्रामध्ये चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेवर संदर्भ क्रमांक १ चे पत्रावर आधारित उचित कारवाई साठी सहकार विभागाचे प्रधान सचिव मंत्रालय मुंबई यांना संदर्भ क्रमांक ३ अन्वये अग्रेशित करण्यात आले आहे. तसेच संदर्भ क्रमांक २ चे पत्र उचित कारवाई साठी मा. उपसचिव (सहकार ७ स) मंत्रालय मुंबई यांना संदर्भ क्रमांक ४ अन्वये अग्रेशित करण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणी चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेवर लवकरच कारवाई केली जाईल अशी आशा आता व्यक्त करण्यात येत आहे.