महादेव जानकरांचे जाहीर विधान; राजकीय भूकंप होणार ?
राज्यातील २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी येत्या २ डिसेंबरला मतदान होणार आहे, तर ३ डिसेंबरला लगेचच मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. एकीकडे राज्यात निवडणुकांचा धुराळा उडत आहे.
तर दुसरीकडे सांगली जिल्ह्यातील जत नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते व माजी मंत्री महादेव जानकर यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. महादेव जानकर यांनी अप्रत्यक्षपणे महाविकासआघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे.
जत नगरपरिषद ही राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जाते. सध्याच्या निवडणुकीत प्रामुख्याने चौरंगी लढत दिसून येत आहे. सांगलीच्या जतमध्ये महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुजय शिंदे व उमेदवारांच्या प्रचारासाठी एक सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत महादेव जानकर यांनी हजेरी लावली. यावेळी महादेव जानकर यांनी जोरदार भाषण केले. या भाषणाद्वारे त्यांनी भाजपवर हल्लाबोल करत महाविकास आघाडीसोबत युती करत असल्याचे संकेत दिले आहेत.


