
या मुद्यावरुन निवडणूक आयोगाच्या वर्मी लागणारा घाव !
राजकीय पक्षांना शेवटची मतदार यादी का दाखवत नाही? मतदार नोंदणी बंद करून लपवाछपवी कशासाठी ? असे थेट भिडणारे प्रश्न राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनाविचारले.
राज्य निवडणूक आयोग, मुख्य निवडणूक आयोगआणि महाराष्ट्राच्या विरोधी पक्षातील नेत्यांच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. काल सुद्धा बैठक झाली. त्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे, उद्धव ठाकरे, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि दिग्गज नेते शरद पवार उपस्थित होते. यावेळी काही मुद्यांवरुन बैठक अपूर्ण राहिलेली. त्यामुळे आज पुन्हा बैठक झाली. यावेळी राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना रोखठोक प्रश्न विचारले. निवडणूक आयोगाच्या उत्तराने समाधान न झाल्याने राज ठाकरे यांनी थेट तुम्ही निवडणुकाच घेऊ नका असा वर्मी लागणारा घाव घातला.
सर्व राजकीय पक्षांचं एकमत होत नाही, तोपर्यंत निवडणूक घेऊ नका. सत्तेतील तीन पक्षांसाठी तुम्ही काम करत नाही“ असं राज ठाकरेंनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनासुनावलं. ‘आमचं तुमचं करू नका, आमच्यासाठी निवडणूक आयोग एकच‘ असं राज ठाकरे म्हणाले. “राजकीय पक्षांना क्लिअर झाल्याशिवाय निवडणूक घेऊ नका. निवडणूक कार्यक्रम रद्द करा“ अशी मोठी मागणी राज ठाकरे यांनी केली.
बाळासाहेब थोरातयंदा लाखाने पडले, हे कसे शक्य?
“बाळासाहेब थोरात आठ टर्म आमदार आहेत. 80-90 हजार मतांनी निवडणूक जिंकतात, यंदा लाखाने पडले, हे कसे शक्य?” असा सवाल राज ठाकरेंनी केला. निवडणूक आयोगाचे दोन्ही अधिकारी निरुत्तर झाले. ‘याद्या आम्हाला द्या, आम्हीही शहानिशा करू‘ अशी मागणी राज ठाकरेंनी केली. “मतदार यादीत घोळ असेल तर तुम्ही सुप्रीम कोर्टाला सांगा, आम्ही तयार नाही. निवडणूक पुढे ढकला“ असं राज ठाकरे म्हणाले.
अजून सहामहिने निवडणूक घेऊ नका
बॅलेटवर निवडणूक घेतली तर जास्त दिवस लागत असतील, तर लागू देत. निवडणूक आयोगाला निवडणूक घेण्याऐवजी काय काम?” असं सरळ राज ठाकरे म्हणाले. “पाच वर्षं निवडणूक घेतली नाही, अजून सहामहिने निवडणूक घेऊ नका. राजकीय पक्षांसाठी, सत्ताधाऱ्यांसाठी काम करता असं दिसतंय असा थेर आरोप राज ठाकरे यांनी केला.