पण अंतिम फेरीचं गणित जुळलं; कसं ते समजून घ्या…
वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील पराभवाची हॅटट्रीक केल्यानंतर भारताचं उपांत्य फेरीचं गणित किचकट झालं होतं. पण भारताने न्यूझीलंडचा पराभव केला आणि उपांत्य फेरीत जागा पक्की केली आहे.
आता उपांत्य फेरीत कोणता संघ समोर येणार याची चर्चा रंगली आहे. असं असताना भारताला थेट अंतिम फेरीचं तिकीट मिळणार असंच दिसत आहे. तुम्हीही विचार करत असाल असं कसं होईल. आम्ही नाही तर वुमन्स वर्ल्डकप स्पर्धेचा इतिहास पाहिला तर तुम्हाला ही बाब लक्षात येईल. आयसीसी स्पर्धेत तिसऱ्यांदा असं समीकरण जुळून आलं आहे. त्यामुळे टीम इंडियाची अंतिम फेरीत खेळण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. पण अंतिम फेरीत जाण्यासाठी उपांत्य फेरीत विजय मिळवणं भाग आहे. उपांत्य फेरी खेळल्याशिवाय टीम इंडिया अंतिम फेरी कशी काय गाठणार? आता उपांत्य फेरीचं तितकं टेन्शन नाही का?
क्रीडाविश्वातील एक योगायोग पाहता हे समीकरण जुळवलं जात आहे. वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारातने जेव्हा जेव्हा न्यूझीलंडला पराभूत केलं आहे, तेव्हा अंतिम फेरीत स्थान मिळवलं आहे. वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेत या दोन्ही संघात 14 वेळा सामना झाला आहे. पण भारताने तीनवेळा न्यूझीलंडला पराभवाचं पाणी पाजलं आहे. या तिन्ही वेळेस टीम इंडियाने अंतिम फेरीत स्थान पक्कं केलं आहे. 2005 वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारताने न्यूझीलंडला 40 धावांनी पराभूत केलं होते. त्या स्पर्धेत अंतिम फेरी गाठली होती.
दुसऱ्यांदा 2017 मध्ये इंग्लंडमध्ये खेळल्या गेलेल्या वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारताने न्यूझीलंडला 186 धावांनी मात दिली होती. या स्पर्धेतही भारताने अंतिम फेरी गाठली होती. त्यानंतर 2025 वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारताने न्यूझीलंडला 53 धावांनी पराभूत केलं आहे. त्यामुळे मागचा इतिहास पाहता भारतीय संघ अंतिम फेरी गाठेल असंच क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे. 2005 आणि 2017 मध्ये भारताला अंतिम फेरीत पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. आताचा वनडे वर्ल्डकप भारतात होत आहे. जर भारताने अंतिम फेरी गाठली तर जेतेपद मिळवेल अशी अपेक्षा आहे.


