भारताच्या अपारंपारिक ऊर्जा क्षेत्राला एक नवीन गती देणारा मोठा करार झाला आहे. INOXGFL Group ची कंपनी Inox Solar ने चीनची प्रमुख सोलार ऊर्जा कंपनी Longi Green Energy Technology सोबत जवळपास 7,000 कोटीचा कॉन्ट्रॅक्ट केला आहे.
या करारातंर्गत पुढच्या तीन वर्षात Inox Solar, Longi कंपनीला 5 गीगावॅटच्या सोलर मॉड्यूलचा पुरवठा करणार आहे. फक्त भारताच्या सोलार इंडस्ट्रीसाठी ही मोठी डील नाहीय, तर जग, भारताच्या सोलार ऊर्जा क्षमतेवर विश्वास ठेवतय. यात चीन सारखा देश सुद्धा आहे.
इकोनॉमिक टाइम्सच्या सुत्रांनुसार, चीनची लॉन्गी ग्रीन एनर्जी भारतीय बाजारासाठी मॉड्यूल Inox Solar कडून विकत घेणार आहे. या डील अंतर्गत लॉन्गी, Inox ला आपली अत्याधुनिक टेक्नोलॉजी आणि जागतिक गुणवत्ता निकष त्या अनुभवाच्या आधारे मदत करेल. आंतरराष्ट्रीय स्तरावर गुणवत्तेच्या बाबतीत Inox च्या उत्पादनांना पसंती मिळावी, हा त्यामागे उद्देश आहे. भारत सोलर मॉड्यूलची देशांतर्गत उत्पादने वेगाने वाढवत असताना ही डील होत आहे. जेणेकरुन आयातीवरील अवलंबित्व कमी होईल.
एक मोठा बदल
Inox Solar ने अलीकडेच अहमदाबाद जवळ बावला येथे नवीन सोलार मॉड्यूल प्लान्ट सुरु केलाय. पहिल्या टप्प्यात ही क्षमता 1.2 गीगावॅट ठेवली आहे. पुढच्या टप्प्यात ही क्षमता 3 गीगावॅट पर्यंत वाढवण्यात येईल. कंपनी एवढ्यावरच थांबलेली नाही. ओदिशाच्या ढेंकनाल येथे अजून एक सोलर सेल आणि मॉड्यूल प्लांट बनवत आहे. त्याची क्षमता 4.8 गीगावॅट असेल. भारतात सोलार निर्मितीच्या दिशेने एक मोठा बदल म्हणून याकडे पाहिलं जातय.
आपली उपस्थिती अजून मजबूत बनवणं हा त्यामागे उद्देश
Inox Solar ची मूळ कंपनी Inox Clean Energy सुद्धा आता सार्वजनिक होण्याच्या तयारीत आहे. कंपनीचा IPO या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत येण्याची शक्यता आहे. भारतात वेगाने वाढणाऱ्या क्लीन एनर्जी आणि मॅन्यूफॅक्चरिंग सेक्टरमध्ये आपली उपस्थिती अजून मजबूत बनवणं हा त्यामागे उद्देश आहे. भारतात वर्तमानात सोलर मॉड्यूल उत्पादन क्षमता 100 गीगावॅटपेक्षा जास्त आहे. सोलर सेल निर्माण क्षमता 27 गीगावॅट आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत ही क्षमता वाढून 40 गीगावॅट होण्याची अपेक्षा आहे.


