अमित शाहांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून ठाकरे गटाचा सल्ला…
महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीला आता कोणत्याही कुबड्यांची गरज उरलेली नसून आमचा पक्ष स्वबळावर मजबूत असून ताकदीने राज्यात उभा आहे, असे परखड मत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी व्यक्त केलं.
यावरून आता विरोधकांनी म्हटलं आहे की भाजपाला आता कुबड्यांची म्हणजेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची गरज राहिलेली नाही. शिवसेनेचे (ठाकरे) खासदार संजय राऊत म्हणाले, अजित पवार व एकनाथ शिंदेंमध्ये थोडा जरी स्वाभिमान असेल तर त्यांनी आता सरकारमधून बाहेर पडायला हवं.
दुसऱ्या बाजूला, कुबड्या म्हणजे मित्र नव्हे असं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमित शाह यांच्या वक्तव्यावर सारवासारव केली आहे. अमित शाह यांच्या या वक्तव्यावरून राज्यात वेगवेगळ्या चर्चेला उधाण आलं आहे. या सर्व घडामोडींचा आढावा आपण या लाइव्ह न्यूज ब्लॉगद्वारे घेणार आहो.


