अजित पवारांच्या पोराचा…
उद्धव ठाकरे मराठवाडा दाैऱ्यावर असून शेतकऱ्यांसोबत संवाद साधत आहेत. कर्जमाफीच्या विषयावरून त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. मराठवाड्याच्या दाैऱ्याचा त्यांचा आज तिसरा दिवस आहे. नुकताच बोलताना उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, केवळ विरोधी पक्ष म्हणून आदळा आपड करायची हा माझा उद्धेश नाहीये.
माझा पक्ष, चिन्ह चोरले गेले. मात्र, माझी माणसं जाग्यावर आहेत. नुसती शेतकऱ्यांची जमीन वाहून गेलेली नाही तर शेतकऱ्यांचे आयुष्य वाहून गेले आहे. त्या वाहून गेलेल्या आयुष्याला आपण जर आता आधार दिला नाही तर मग पुढे काय करणार? जमिनी सर्व हे ढापणार कारण यांना सर्व माहिती आहे की, कुठून काय जातंय.
अगोदर हे तुमच्याकडून एकदम कमी भावाने जमिन घेणार आणि त्यानंतर या जमिनीची सोन्यापेक्षाही जास्त किंमत वाढेल. अजित पवारांच्या पोराचे प्रकरण काढलंय अंबादासने. हे सर्व चक्र फार जास्त घाणेरडे आहे. महामार्गातील जमिनी कोण खरेदी करतंय बघा. शक्तीपीठ महामार्गाच्या शेजारी कोण जमीन खरेदी करतंय हे देखील पाहा. शक्तीपीठ महामार्गाच्या बाजूच्या जमिनी दलालांच्या आहेत. उद्धव ठाकरे टोमणे मारतात, असे मुख्यमंत्री बोलतात. न्याय मागितला की, टोमणे मारतात असे बोलतात.
पुढे बोलताना उद्धव ठाकरेंनी म्हटले की, मी माझे कर्तव्य म्हणून कर्जमुक्ती केली होती, उपकार म्हणून नाही. आज तर मी कोणीही नाहीये… माझे वडील चोरले, पक्ष चोरले सर्वकाही चोरले माझी माणसे जाग्यावर आहेत, ती नाही तुम्ही चोरू शकत. माझं कर्तव्य आहे की, काहीही नसतानाही ही जी ताकद आहे, त्या ताकदीसाठी काम करणं. राज्यातील शेतकरी संकटात आहे. या सर्व व्यथा मी ऐकत आहे आणि या माहिती नाहीत, असेही नाहीये.
उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंचा नगरभकास मंत्री म्हणून उल्लेख केला. मुख्यमंत्री व्यस्त आहेत. शेतकरी टाहो फोडतायत आणि CM बिहारमध्ये.. तिथे जाऊन म्हणतात ये अंदर की बात है बिहारवर PM च प्रेम आहे. इथे बहिणींना दीड हजार देऊन मत मिळवले आणि आता विसरले.. बिहारमध्ये 10 हजार असं का? बँकेचा फायदा होऊ न देता कसा शेतकऱ्यांचा फायदा होईल ते CM ने सांगावे, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले.


