दहशतवादी हल्ला असल्याचा संशय…
राजधानी दिल्लीमधील लाल किल्ला परिसरात झालेल्या भीषण स्फोटाने संपूर्ण देश हादरुन गेला आहे. दिल्ली मेट्रो स्टेशनजवळ एका कारमध्ये झालेल्या या स्फोटात 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे तर 30 जण गंभीर जखमी झाले आहेत.
या स्फोटात आसपासच्या गाड्यांचे मोठे नुकसान झाले. या घटनेनंतर देशात अलर्ट जारी करण्यात आली असून सुरक्षा यंत्रणांनी तपास सुरु केला आहे. हा स्फोट आत्मघाती दहशतवादी हल्ला असल्याचा गुप्तचर संस्थांना संशय असून दहशतवादी कृत्ये आणि त्यांच्या शिक्षेशी संबंधित यूएपीएच्या कलम १६ आणि १८ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.


