राम मंदिर; काशी होते टार्गेट !
दिल्ली स्फोट प्रकरणात सूत्रांनी मोठा खुसाला केला आहे. मुख्य संशयीत मुझम्मीलनं तपास यंत्रणांना सांगितलं की तो आणि उमर यांनी यापूर्वीच दिल्लीतील लाल किल्ला परिसराची रेकी केली होती.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुझम्मील याची कसून चौकशी सुरू आहे. त्यात त्यानं दिलेली माहिती ही त्याच्या फोन डेटाचा तपास करून कन्फर्म केली आहे. चौकशीदरम्यान मुझम्मीलनं लाल किल्ला परिसरात पुढच्या वर्षीच्या २६ जानेवारीला हल्ला करण्याची योजना होती असं सांगितलं. सूत्रांनी मुझम्मीलनं पोलिसांना सांगितलं की ते दिल्लीत दिवाळीच्या दरम्यान गर्दीच्या ठिकाणी देखील हल्ला करण्याच्या तयारीत होते. मात्र ही योजना नंतर कार्यान्वित करण्यात आली नाही.
दिल्लीतील स्फोट प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून झालेल्या चौकशीनंतर मोठी माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, दहशतवाद्यांच्या रडारवर काशी आणि अयोध्या ही दोन पवित्र शहरे होती.
मुझम्मील हा पेशान डॉक्टर आहे. त्याला लाल किल्ला मेट्रो स्टेशन स्फोट प्रकरणी ताब्यात घेण्यात आलं आहे. दिल्लीतील हल्ल्यानंतर सर्व सुरक्षा आणि तपास यंत्रणा अलर्ट मोडवर आल्या आहेत. उमर आणि मुझम्मील याचा साथीदार आणि फरीदाबादमधील अल फलाह विद्यापीठातील सहकारी हा लाल किल्ल्याजवळील कार स्फोटात मरण पावल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
लाल किल्ला कार स्फोटातील आतापर्यंतच्या तपासात या घटनेत काही उच्च शिक्षित ग्रुप सामील असल्याची माहिती समोर आली आहे. त्यात वैद्यकीय क्षेत्रातील अनेकजणांचा समावेशी आहे. त्यातील बहुतांश लोकं फरीदाबादमधी अल फलाह विद्यापीठात काम करणार आहेत. जम्मू काश्मीर पोलीसांनी या नेटवर्कला व्हाईट कॉलर टेरर इकोसिस्टम म्हणून संबोधलं आहे.
त्यांनी सांगितलं की, ‘हा ग्रुप कम्युनिकेशन करण्यासाठी, निधी इकडून तिकडे वळवण्यासाठी आणि समन्वय साधण्यासाठी एन्क्रिप्टेड चॅनल्सचा वापर करत होता. ते त्यांच्या पेशातून आणि शैक्षणिक कामातून आलेला पैसा दहशतवादी कारवायांसाठी वळवत होते. आरोपी हे लोकांना हेरून त्यांना कट्टरवादारडे वळवणे, त्यांची दहशतवादी कार्यासाठी भरती करून घेणे, आर्थिक निधी जमवणे, लॉजेस्टिकची सोय करणे, शस्त्र खरेदी आणि आईडी तयार करण्याचं सामान गोळा करणे या कृत्यात सामील असल्याचं समोर आलं आहे.


