जसप्रीत बुमराहच्या हाती लागला पंजा…
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये दोन सामन्यांच्या मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे. या मालिकेच्या पहिल्या सामन्यात पहिल्या डावामध्ये 159 धावांवर गुंडाळले आहे.
पहिल्या डावामध्ये 55 ओव्हरचा खेळ झाला यामध्ये भारताच्या संघाने सर्व फलंदाजांना बाद करुन पहिला डाव 159 धावांवर संपवला आहे. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दुपारच्या जेवणापर्यंत तीन विकेट गमावल्यानंतर, दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या सत्रात आणखी पाच विकेट गमावल्या.
दक्षिण आफ्रिकेने एडेन मार्कराम आणि रायन रिकल्टन यांच्या जोडीने पहिल्या विकेटसाठी ५७ धावा जोडून चांगली सुरुवात केली, परंतु त्यानंतर संघाला संघर्ष करावा लागला. भारतीय प्लेइंग इलेव्हनने सर्वांना आश्चर्यचकित केले. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने सुरुवात चांगली केली पण त्यानंतर सर्व फलंदाजांना संघर्ष करावा लागला. या पहिल्या डावामध्ये जसप्रीत बुमराह याने संघासाठी 5 विकेट्स नावावर केले आहे.


