‘या’ बड्या नेत्याने हाती घेतलं कमळ; जिल्ह्याच्या राजकारणात उलथापालथ…
निवडणूकीच्या तोंडावर राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. नाशिक जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चाहूल लागत असतानाच एक मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे.
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाचे उपनेते अढव हिरे यांनी पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राजकिय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.
विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळालेल्या अढव हिरे यांचा हा पुनर्प्रवेश नाशिकच्या समीकरणांमध्ये नवा बदल घडवणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अढव हिरे यांच्या निर्णयामुळे मंत्री दादा भुसे यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहणार असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
मुंबई आज दि. 18 नोंव्हेंबर रोजी भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे. त्यांच्या या निर्णयामुळे उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. अढव हिरे यांच्यावर काही गुन्हे दाखल करण्यात आले होतो त्यामुळे पक्षांतर केला जात असल्याची चर्चा एकीकडे रंगली आहे. तर दुसरी कडे या निर्णयामुळे नाशिक आणि मालेगाव येथील राजकारणातील समीकरणे बदलत जाणार असे बोलले जात आहे.


