अर्थव साळवींनी शेअर केली भावनिक पोस्ट !
शिंदे गटाचे नेते माजी नगराध्यक्ष राजन साळवी यांचा मुलगा अथर्व साळवी यांना प्रभाग क्रमांक 15मधून उमेदवारी नाकारण्यात आली आहे. राजन साळवी यांचा मुलगा अथर्व राजन साळवी प्रभाग क्रमांक 15 मधून इच्छुक होते.
मात्र उमेदवारी नाकारल्यानंतर राजन साळवी यांच्या मुलाने लिहलेले भावनिक पत्र सोशल मिडियावर व्हायरल झाले आहे.
रत्नागिरीकर आणि प्रभाग क्रमांक १५ मधल्या जनतेला स्टेटस्द्वारे पत्र लिहून अर्थव साळवी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. महायुतीच्या निर्णयाने निवडणुकीतून बाजूला व्हावं लागत आहे असं त्यांनी सांगितलं आहे. ‘नेतृत्व सोडत आहे पण लोकांची सेवा तुमच्यासाठी धडपड आणि तुमच्या कामासाठी धावपळ कधीच सोडणार नाही. राजकारण बदलू शकतं. पदं येतात-जातात. पण नातं ? ते मात्र कायम राहतं तुमचं आणि माझं, ‘असं भावनिक स्टेटस अर्थव साळवी यांनी म्हटलं आहे. मुलाला उमेवदवारी नाकारल्याने राजन साळवी देखीळ नाराज असल्याचे म्हंटले जात आहे.
जागा भाजपला सोडली जाण्याची शक्यता
यामुळे उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेत गेलेल्या माजी आमदार राजन साळवी यांना मोठा धक्का बसला आहे. साळवी यांनी रत्नागिरी नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 15 मधून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली होती. मात्र आता शिंदेंच्या शिवसेनेकडून ही जागा भाजपला सोडली जाण्याची शक्यता आहे. किंवा भाजपमधील एखादा आयात उमेदवार घेऊन त्याला शिवसेनेत दाखल करून उमेदवारी देण्याची शक्यता आहे. यासाठी उदय सामंत यांच्यावर दबाव असल्याचेही आता बोलले जात आहे. त्यामुळे आता प्रभाग 15 बाबत अंतिम निर्णय कोणता घेतला जाणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


