ठाणे ग्रामीण प्रतिनिधी – विकी जाधव
ठाणे,दि.19(जिमाका):-येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तसेच राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त शपथ ग्रहण करण्यात आली.
यावेळी अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदीप माने, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) रूपाली भालके, तहसिलदार सचिन चौधर, रेवण लेंभे, अमोल कदम, जिल्हाधिकारी महोदयांचे स्वीय सहाय्यक गिरीश काळे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.




