कितीतरी रात्री मी…
सानिया मिर्झा मागील काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे तूफान चर्चेत आहे. सानियाने पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकसोबत लग्न केले. लग्नानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये राहण्यापेक्षा त्यांनी दुबईत राहणे निवडले.
अचानक एक दिवस शोएब मलिकने त्याच्या लग्नाची काही फोटो सोशल मीडियावर शेअर केली आणि सर्वांनाच धक्का दिला. शोएबने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत लग्न केले. त्यापूर्वी सानिया आणि शोएबच्या घटस्फोटाची अजिबात चर्चा नव्हती. सनासोबत लग्न करण्याच्या अगोदर सानिया आणि शोएबचा घटस्फोट झाल्याचे स्पष्ट करण्यात झाले. शोएबसोबतच्या घटस्फोटानंतर सानिया मिर्झाने दुबई सोडली नाही. तिने दुबईतच राहण्याचा निर्णय घेतला. शोएबने तिसरे लग्न केल्यानंतर सानियाने अनेक गोष्टींवर भाष्य करणे टाळले.
आता घटस्फोटाच्या काही महिन्यानंतर पहिल्यांदाच घटस्फोटानंतर आयुष्य कसे झाले हे सांगताना सानिया दिसली. सानियाच्या शोमध्ये करणे जोहर हा पोहोचला. करणसोबत बोलताना सानिया मिर्झाने म्हटले की, माझ्यासाठी सिंगल पालक असणे खरोखरच खूप जास्त कठीण आहे. तू असो किंवा मी.. दोघेही वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतो. यावेळी सानियाला सकारात्मक करत करण म्हणतो की, पण याचा दुसरा भाग तू बघितला का?
आपल्याला कोणाची मर्जी किंवा त्यांच्या विचारांमध्ये फसण्याची अजिबातच गरज पडत नाही. सानिया मिर्झा हिने पुढे म्हटले की, मी दुबईत राहते. अशा परिस्थितीमध्ये कामानिमित्त माझ्या मुलाला दुबईत सोडून भारतात येणे माझ्यासाठी सर्वात कठीण ठरते. माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण तो भाग आहे. सिंगल पालक असल्याने तो फक्त कठीण काळ असतो माझ्यासाठी बाकी कोणत्या गोष्टीची समस्या येत नाही.
पुढे सानिया बोलताना म्हणाली की, मी कितीतरी वेळा रात्री जेवण करत नाही. रात्री एकटे बसून कोण खाणार ना? मला वाटते की, यामुळे वजन कमी करण्यासाठी मदत झाली. मला रात्रीचे जेवण करण्याची इच्छा होत नाही. माझे मनच करत नाही की, मी रात्री जेवावे. मला फक्त काही बघत बघत झोपायला आवडते. आता सानियाच्या या विधानाची जोरदार चर्चा होताना दिसत आहे.


