वर्ल्ड कपसाठी दिलं मानाचं स्थान !
रोहित शर्माची किंमत भारतात गौतम गंभीर यांना नसली तरी आयसीसीने मात्र त्याचा मोठा सन्मान केला आहे. वर्ल्ड कपबाबतची मोठी घोषणा आयसीसीने आज केली. यामध्ये रोहित शर्माला मानाचे स्थान देण्यात आले आहे.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने टी २० वर्ल्ड कप जिंकला. त्यानंतर रोहित शर्माने टी २० क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर रोहित शर्मा कसोटी आणि वनडे क्रिकेट खेळू शकणार होता. पण गौतम गंभीर यांनी रोहित शर्माकडून कसोटी संघाचे कर्णधारपद काढून घेतले, त्यानंतर रोहित शर्माला कसोटी क्रिकटमधून निवृत्ती पत्करावी लागली. त्यामुळे रोहित शर्मा आता भारताकडून फक्त वनडे क्रिकेटचं खेळणार होता. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. पण चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकूनही रोहित शर्माकडून गौतम गंभीर आणि अजित आगरकर यांनी वनडे संघाचे कर्णधारपद काढून घेतले. रोहितचं कर्णधारपद का काढून घेतलं, याचं कोणतही कारण गौतम गंभीर आणि अजित आगरकर यांच्याकडे नव्हतं. त्यामुळे रोहित शर्मा फक्त एक खेळाडू म्हणूनच संघात राहणार होता. पण रोहित शर्मा वर्ल्ड कप खेळणार की नाही, याबाबत गंभीर यांनी चक्रावणारं वक्तव्य केलं होतं. पण रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाचा दौरा गाजवला आणि आपले संघातील स्थान निश्चित केले. पण आता आयसीसीने रोहित शर्माचा मोठा सन्मान केला आहे.
भारतामध्ये पुढच्या वर्षी टी २० वर्ल्ड कप स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. या वर्ल्ड कपचा ब्रँड ॲम्बेसिडर आता रोहित शर्मा असणार आहे, अशी घोषणा आता आयसीसीने केली आहे. वर्ल्ड कपचा ब्रँड ॲम्बेसिडर होणं, हा सर्वोच्च सन्मान समजला जातो, हा सन्मान आता रोहित शर्माला मिळणार आहे. आयसीसीने रोहितला एक मोठी जबाबदारी दिली आहे. त्यामुळे रोहितचा आयसीसीने सन्मान केला असला तरी त्याच्यावर एक मोठी जबाबदारीही टाकली आहे.
रोहित शर्मा आता भारताच्या टी २० संघात नसला तरी तो T20 वर्ल्ड कपमध्ये असणार आहे. कारण या स्पर्धेसाठी त्याला मानाचे स्थान देण्यात आले आहे.


