ठाणे ग्रामीण प्रतिनिधी,विकी जाधव
ठाणे,दि.02(जिमाका) :- केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्या भूमी संसाधन विभागामार्फत NAKSHA हा पथदर्शी प्रकल्प राबिवला जात आहे. त्यामध्ये कुळगाव बदलापूर नगरपरिषदेची निवड करण्यात आली असून त्यामध्ये नगरपरिषद हद्दीतील मौजे- 1) एरंजाड, 2) सोनिवली, 3) कुळगाव, 4) बदलापूर, 5) जोवेली, 6) वालिवली, 7) कात्रप, 8) शिरगाव, 9) मांजर्ली, 10) खरवई, 11) माणकिवली, 12) बेलवली या 12 गावांची निवड करण्यात आली आहे.
या नक्शा प्रकल्पाच्या अंतर्गत निवड करण्यात आलेल्या 12 गावामधील नगर भूमापन अभिलेख तयार करण्याकरिता चौकशी अधिकारी यांची नेमणूक करण्यात आलेली असून त्यानुसार मिळकतीची चौकशी करणे, नवीन मिळकत पत्रिका बनविणे, मिळकतीला नवीन नगर भूमापन क्रमांक देणे इत्यादी कामे करण्यात येणार आहेत. या योजनेमुळे नागरिकांना मालकी हक्क पुरावा प्राप्त होणार असून मालमत्तेबाबत पारदर्शकता निर्माण होऊन मिळकतीचे नकाशान्वये सीमा निश्चित होऊन भविष्यातील वाद निर्माण होणार नाही. नागरी हक्काचे संरक्षण होऊन नागरिकांना कर्ज सुविधा मिळणे सुलभ होणार आहे. या योजनेची सुरुवात 5 डिसेबर 2025 रोजी मौजे-जोवेली तालुका-अंबरनाथ जिल्हा-ठाणे येथून चौकशी कामाची सुरुवात नेमलेले चौकशी अधिकारी करणार असून नागरिकांची सजग होऊन सहकार्य करावे.
नागरिकांनी चौकशी कामी खालील कागदपत्रे उपलब्ध करून देणेची आहे.
1) हक्क अभिलेख, 2) खरेदी दस्त, 3) भाडेपट्टा करार, 4) बक्षीशपत्र, 5) हक्क त्यागपत्र/हक्क सोड, 6) तडजोड नामा/समझोता दस्तऐवज, 7) गहाण खत, 8) कब्जा प्रमाणपत्र, 9) विभाजन पत्र, 10) मंजूर रेखांकन नकाशा, 11) मालमत्ता कर पावती, 12) बांधकाम परवानगी आराखडा, 13) वसीहात नामा/मृत्यू पत्र/इच्छा पत्र, 14) मुखत्यारपत्र, 15) विक्री करार, 16) वीज, पाणी, गस इत्यादी उपयोगिता देयके, 17) जमीन नोंदीचे फेरफार प्रमाणपत्रे, 18) गुंठेवारी अधिकृत केलेबाबतचे आदेशपत्र, नियमितीकरण दाखला, मंजूर नकाशे वैगरे.
या संबंधित नागरिकांना काही अडचणी असतील, तसेच कागदपत्रे सादर करावयाची असल्यास खालील कार्यालयाशी संपर्क साधावा.
कार्यालयाचा पत्ता व संपर्क क्रमांकः उप अधीक्षक भूमि अभिलेख अंबरनाथ, तहसिल कार्यालयाच्या आवारात, अंबरनाथ बदलापूर रोड, अंबरनाथ (पश्चिम) Email id-dyslrambarnath@gmail.com असे उप अधीक्षक भूमी अभिलेख, अंबरनाथ यांनी कळविले आहे.

