प्रतिनिधी / स्वाती हडकर
जिल्हा परिषद व पंचायत समिती चिपळूण सार्वत्रिक निवडणूक २०२६ अंतर्गत खेर्डी देऊळवाडी येथील मतदान केंद्र क्रमांक ७९ वर मतदानासाठी मतदारांनी सकाळपासूनच रांगा लावल्याचे चित्र पाहायला मिळाले. मतदानाच्या पहिल्या सत्रातच नागरिकांचा उत्साह मोठ्या प्रमाणात दिसून आला.
लोकशाहीच्या या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी महिला, युवक तसेच ज्येष्ठ नागरिकांनीही वेळेआधी मतदान केंद्रावर हजेरी लावली. निवडणूक प्रशासनाकडून मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी आवश्यक त्या सुविधा आणि सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.
मतदान केंद्र परिसरात शांततेत आणि शिस्तबद्ध वातावरणात मतदान सुरू असून, दिवसभरात मतदानाचा टक्का वाढण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
