चिपळूण प्रतिनिधी / स्वाती हडकर
चिपळूण तालुक्यातील मालदोली मतदान केंद्र क्रमांक २ येथे आज मतदान सुरू असताना एकूण ७५ मते नोंदविल्यानंतर सकाळी १० वाजता ईव्हीएम मशीन बंद पडली. मशीनमधील तांत्रिक बिघाडामुळे मतदान प्रक्रिया ठप्प झाली आहे.
मतदानासाठी आलेले नागरिक संतप्त होऊन मतदान न करताच घराकडे परतल्याचे चित्र पाहायला मिळाले. यामध्ये अपंग, दिव्यांग तसेच वृद्ध मतदारांनाही मतदानासाठी आणण्यात आले होते; मात्र मशीन बंद असल्याने त्यांचीही मोठी गैरसोय झाली.
या प्रकारामुळे मतदारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, मतदान कधी सुरू होणार याबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
