जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली:जगदीश वेन्नम
गडचिरोली :गडचिरोली जिल्ह्यात भामरागड तालुक्यातील फोडेवाडा महाराष्ट्र -छत्तीसगड सीमेवरील शेवंच टोकावर घनदाट जंगलात अबूजमाड परिसरात मागील तीन दिवसापासून सुरु असलेल्या नक्षल-माओवादी अभियानात गडचिरोली पोलीस आणि सिआरपीएफ यांच्या माओवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत सात जहाल माओवाद्याला ठार घालण्यात पोलीस दलास मोठा यश प्राप्त झालं आहे.
गडचिरोली विभागीय समितीचा प्रभारी, पश्चिम सब झोनल ब्युरोचा प्रभारी व कंपनी क्र. 10 चा प्रभारी डिकेएसझेडसी प्रभाकरसह 01 सिवायपीसी/कमांडर, 01पीपीसीएम, 02 एसीएम दर्जाच्या वरीष्ठ माओवाद्यांसह 02 सदस्य पदावरील माओवाद्यांना ठार घालण्यात गडचिरोली पोलीस दलास यश
महाराष्ट्र शासनाने त्यांच्यावर एकत्रितपणे जाहिर केले होते एकूण 71 लाख रुपयांचे बक्षिस
चकमकीदरम्यान विशेष अभियान पथकातील एक पोलीस जवान शहिद तर एक जखमी
तीन दिवस – तीन रात्र चाललेल्या अभियानादरम्यान घटनास्थळावरुन 03 एके-47 रायफल, 01 एसएलआर व 01 .303 रायफल अशा 05 अग्निशस्त्रांसह मोठया प्रमाणावर दारुगोळा व माओवादी साहित्य जप्त
गडचिरोली जिल्ह्रातील माओवादी चळवळ आता केवळ अबुझमाड मधील भामरागड तालुक्याच्या सिमावर्ती भागातच बंदीस्त झालेला असताना अशावेळी दिनांक 03 फेब्राुवारी 2026 रोजी गडचिरोली – नारायणपूर जिल्ह्रांच्या सिमावर्ती भागातील जंगल परिसरात विध्वंसक कारवाया करुन घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने कंपनी क्र. 10 चे उर्वरीत माओवादी व छत्तीसगड राज्यातील अज्ञात दलममधील माओवादी एकत्र येऊन दबा धरुन बसले आहेत, अशा गोपनीय सुत्रांकडून मिळालेल्या विश्वसनीय माहितीवरुन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी, भामरागड अमर मोहिते यांच्या नेतृत्वात गडचिरोली पोलीस दलातील विशेष अभियान पथकाच्या 14 तुकड्या दिनांक 03 फेब्राुवारी 2025 रोजी रात्री तातडीने सदर जंगल परिसरात माओवादविरोधी अभियान राबविणेकामी रवाना करण्यात आल्या होत्या. अतिशय दुर्गम व कठीण भूभागाचा सामना करत पोलीस पथक मोठया हिंमतीने सदर जंगल परिसरात दाखल झाले होते.
यावेळी सदर जंगल परिसरात दिनांक 04 फेब्राुवारी 2026 रोजी पोलीस पथके शोध अभियान राबवित असताना जंगलात दबा धरून बसलेल्या माओवाद्यांनी जवानांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार सुरु केला. त्यावेळी जवानांनी प्रत्युत्तरादाखल व स्वसंरक्षणासाठी माओवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला. यावेळी काही काळ चाललेल्या चकमकीदरम्यान पोलीस पथकांकडून माओवाद्यांचे 02 तळ उद्ध्वस्त करण्यात येऊन घटनास्थळावरुन मोठया प्रमाणात माओवादी साहित्य हस्तगत करण्यात आले. मात्र, यावेळी प्रतिकूल भूभाग आणि घनदाट जंगलामूळे माओवाद्यांचा शोध लागू शकला नाही. यानंतर दिनांक 05 फेब्राुवारी 2026 रोजी सदर अभियान सुरु ठेवण्याचे ठरविण्यात येऊन विशेष अभियान पथकाच्या अतिरीक्त 04 तुकड्या व सीआरपीएफ क्युएटी चे 01 पथक देखील सदर अभियानात सहभागी होणकामी पाठविण्यात आले होते. यावेळी अधूनमधून माओवादी आणि पोलीसांमध्ये चकमक सुरु असतांना दिनांक 05 फेब्राुवारी 2026 रोजी झालेल्या चकमकीदरम्यान घटनास्थळावर 03 जहाल माओवाद्यांचे मृतदेह व 01 एके 47 रायफल आणि 01 एसएलआर रायफल अशी 02 अग्नीशस्त्रे हस्तगत करण्यात पोलीस पथकास यश आले होते. तसेच सुरु असलेल्या या अभियानादरम्यान काल दिनांक 06 फेब्राुवारी 2026 रोजी पोलीस पथके आणि माओवाद्यांमध्ये पुन्हा झालेल्या चकमकीत एकूण 04 इतर जहाल माओवाद्यांचे मृतदेह घटनास्थळावरुन हस्तगत करण्यात आले. एकंदरीत एकूण तीन दिवस चाललेल्या या अतिशय कठीण अशा अभियानादरम्यान अतिदुर्गम भूभागाचा सामना करत पोलीस जवानांनी राबविलेल्या अभियानादरम्यान एकूण 07 माओवाद्यांना ठार घालण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आले आहे.
माओवाद्यांविरुद्ध शौर्याने लढा देत असताना, दिनांक 05 फेब्राुवारी 2026 रोजी संध्याकाळी उशीरा माओवाद्यांनी केलेल्या जोरदार गोळीबारात विशेष पथक प्राणहिता येथील पोशि/5228 दिपक चिन्ना मडावी हे एक गोळी लागून जखमी झाले होते. त्यांना काल पहाटे अबुझमाड येथील घनदाट जंगलातून हेलीकॉप्टरच्या मदतीने बाहेर काढून उपजिल्हा रुग्णालय भामरागड येथे हलविण्यात आले होते. परंतू दुर्देैवाने अभियानादरम्यान आलेल्या जखमांमूळे दिपक चिन्ना मडावी यांना वीरगती प्राप्त झाली. त्यांना काल दिनांक 06 फेब्राुवारी 2026 रोजी पोलीस मुख्यालय, गडचिरोली येथे मानवंदना देण्यात येऊन भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.
सदर अभियानादरम्यान विशेष अभियान पथकातील जवान जोगा मडावी रा. किष्टय्यापल्ली जि. गडचिरोली हे देखील गोळी लागून जखमी झाले होते. काल त्यांना देखील हेलीकॉप्टरच्या मदतीने गडचिरोली येथे आणण्यात आले होते. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर गडचिरोली येथे उपचार सुरु आहेत.
सदर अभियानादरम्यान ठार घातलेल्या सातही माओवाद्यांची ओळख पटली असून त्याची माहिती खालीलप्रमाणे आहे,
– प्रभाकर ऊर्फ रवी ऊर्फ प्रकालवीर ऊर्फ स्वामी ऊर्फ लोकेती चंदरराव
वय – 57 रा. इसरोजीवाडा, जि. कामारेड्डी (तेलंगाणा) डिकेएसझेडसीएम/ प्रभारी, पश्चिम सब झोनल ब्युरो, प्रभारी कंपनी क्र. 10 या नक्षल नेत्यावर 25 लाख रुपये .चकमक 73,खून 13,जाळपोळ6
इतर 21,असे एकुण 113 हिंसक कारवाई गुन्यात सहभागी होतं.
-पागु मोड्याम, वय 30 वर्षे, रा. डल्ला, ता. आवापल्ली, जि. बिजापूर (छ.ग.)
कंपनी क्र. 05 सिवायपीसी/कमांडर, कंपनी क्र. 05 ,यांचवर 16 लाख रुपये बक्षीस.हिंसक घटनांमध्ये त्याच्या सहभागा बद्दल पडताळणी करणे सुरु आहे.
अनिला ऊर्फ बुदरी कोवाची, वय 24 वर्षे, रा. सुकमा (छ.ग.) पीपीसीएम (प्रभाकरच गार्ड) हीचवर 08 लाख रुपये बक्षीस,
चकमक 08,खून 01,इतर 03
एकुण 12 हिंसक कारवाई गुन्यात सहभागी होती
– कामेश पदा, वय 35 वर्षे, रा. दरबा, जि. सुकमा (छ.ग.) स्पेशल प्लाटुन माड एरीया पीपीसीएम / कमांडर स्पेशल प्लाटुन माड एरीया यांच्यावर
08 लाख रुपये बक्षीस होते
हिंसक घटनांमध्ये त्याच्या सहभागा बद्दल पडताळणी करणे सुरु आहे.
-भजनाथ ऊर्फ भिमा होळी, वय 40 वर्षे, रा. टेकालगुडेम (पोस्टे जागरगुंडा) ता. कोंटा, जि. सुकमा (छ.ग.)
परालकोट दलम एसीएम , याचं वर
06 लाख रुपये बक्षीस
हिंसक घटनांमध्ये त्याच्या सहभागा बद्दल पडताळणी करणे सुरु आहे.
-मंगली कुरसाम, रा. पश्चिम बस्तर (छ.ग.) कंपनी क्र. 10 सदस्य हिचंवर
04 लाख रुपये बक्षीस
हिंसक घटनांमध्ये तिच्या सहभागा बद्दल पडताळणी करणे सुरु आहे.
-जोगी सोढी-मडावी, वय 27 वर्षे, रा. बुडगीचेरु, जि. बिजापूर (छ.ग.)
कंपनी क्र. 05 सदस्य
06 लाख रुपये बक्षीस
हिंसक घटनांमध्ये तिच्या सहभागा बद्दल पडताळणी करणे सुरु आहे.
जप्त अग्निशस्त्रे व साहित्य
एके – 47 रायफल – 03,एसएलआर- 01,303 रायफल – 01,जिवंत काडतूस173,बीजीएल3,मॅगझीन07,कॉर्टेक्स वायर बंडल 2,एकुण बक्षिस – 71 लाख.
वरील मृतक माओवाद्यांवर चकमक, जाळपोळ व खुन इ. वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. यासोबतच सदर घटनास्थळावरुन 03 एके-47 रायफल, 01 एसएलआर व 01 .303 रायफल असे एकूण 05 अग्निशस्त्र, कॉर्टेक्स वायरचे 02 बंडल, 03 बिजीएल, एकूण 07 मॅगझिन, एकूण 173 जिवंत काडतूस, 10 जिलेटीन कांड्या, माओवादी साहित्य व इतर दैनंदिन वापराचे साहित्य हस्तगत करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आले आहे.
सदरचे माओवादविरोधी अभियान अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती) डॉ. छेरिंग दोरजे, विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) नागपूर संदिप पाटील, पोलीस उप-महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र अंकित गोयल, उप-महानिरीक्षक (अभियान) सिआरपीएफ अजय कुमार शर्मा, पोलीस अधीक्षक, गडचिरोली नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक, अहेरी कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., पोलीस उप-अधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी, भामरागड अमर मोहिते यांच्या नेतृत्वात सी-60 आणि सिआरपीएफच्या जवानांनी यशस्वीपणे पार पाडले. सन 2021 पासून आजपावेतो गडचिरोली पोलीसांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे 99 कट्टर माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले असून, 140 माओवाद्यांना अटक करण्यात आले आहे व 153 माओवाद्यांनी गडचिरोली पोलीसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. सदर खडतर अभियानादरम्यान सी-60 व सिआरपीएफच्या जवानांनी दाखविलेल्या या शौर्यपुर्ण कामगिरीचे पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांनी कौतुक केले आहे. सदर अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी आणि सर्व जवानांना सुखरूप परत आणण्यासाठी संपूर्ण अभियानाची देखरेख करुन अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गडचिरोली गोकुल राज जी. यांच्यासह सी-60 गडचिरोली आणि प्राणहिताचे इतर अधिकारी व अंमलदार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तसेच पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी सदर भागात माओवादविरोधी अभियान आणखी तीव्र करण्याचे संकेत दिले असून पून्हा एकदा उर्वरित सर्व माओवाद्यांना हत्यार ठेवून आत्मसमर्पण करुन मुख्य धारेमध्ये प्रवेश करण्यासाठी आवाहन केले आहे.

