डोणगाव | प्रतिनिधी – सालार बेग
डोणगाव, दि. ११ फेब्रुवारी २०२६ : जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळा, डोणगाव येथे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात व जल्लोषात पार पडले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. सद्दाम शाह यांनी भूषविले.
या कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद सभापती श्री. राजेंद्र पळसकर, जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष श्री. शैलेश सावजी, ज्येष्ठ नेते श्री. नाझिम भाई कुरेशी, ग्रामपंचायत सदस्य जोईप खान, दिलुभाई ठेकेदार, जावेद खान ठेकेदार, जलाल खान, राजेश जाधव, बाबर देशमुख, आसिफ खान, रजिक खान, रब्बानी शाह, मोहसीन खान, साबीर खान, आजम बागवान तसेच डोणगाव येथील पत्रकार बांधव जमीर शहा, जमील पठाण, यासीन बेग, हमीद मुल्लाजी, अबरार खान मिल्ली, अशोक वानखेडे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमास मोठ्या संख्येने पालक व ग्रामस्थ उपस्थित होते. विशेषतः महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते लोकवर्गणीतून उभारण्यात आलेल्या नवीन रंगमंचाच्या उद्घाटनाने करण्यात आली. या उपक्रमाचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले तसेच शाळेच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले.
स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर, सामाजिक व शैक्षणिक विषयांवरील बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. देशभक्तीपर गीते, नाटिका, समूह नृत्य व प्रबोधनात्मक सादरीकरणांमुळे संपूर्ण वातावरण उत्साहमय झाले. लहानग्या विद्यार्थ्यांनी आपल्या सुप्त कलागुणांचे उत्कृष्ट सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक रब्बानी सर यांनी केले. त्यांनी शाळेच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेत पालकांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनवर अहमद अन्सार अहमद यांनी प्रभावीपणे केले.
अध्यक्षीय समारोप करताना श्री. सद्दाम शाह यांनी विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे व पालकांचे अभिनंदन करून आभार मानले. या स्नेहसंमेलनामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक मो. जाकीर, रफिक खान, मो. कलीम, वसीम खान, असलम अली, शेख मुजीब, शेख इरफान, अजहर देशमुख, रुकय्या बेगम व गजाला मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले
