अमरावती (प्रतिनिधी )- संजय सरवटकर
अमरावती (प्रतिनिधी )- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे व महाराष्ट्र उद्योजकता विकास विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने अमरावती येथे अनुसूचित जातीच्या युवक व युवतीकरिता त्यांना आधुनिक कौशल्य देणे, स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करणे, आणि उद्योजकतेकडे वाटचाल घडवून आणणे या उद्धेशाने एक व दोन महिन्याचे शिबीर आयोजित केले आहे, याशिबिरात विविध प्रकारचे एक व दोन महिन्याच्या कालावधीत प्रशिक्षण देण्यात येणार असून यात एक महिन्याच्या कोर्स करिता किमान 8 वी व दोन महिन्याच्या कोर्स करिता किमान पदवीधर असणे आवश्यक आहे, उमेदवाराचे वय किमान 18 व कमाल 45 असणे आवश्यक असून उमेदवारची निवड प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे करण्यात येणार असून यात महिलांना विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे.निवड झालेल्या उमेदवारांसाठी एक दिवसीय परिचय मेळावा घेण्यात येणार असून या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन एम. सी. ई. डी. चे प्रकल्प अधिकारी श्री नेत्रदीप चौधरी यांनी केले आहे.
