चालू वार्ता माळशिरस प्रतिनिधी- राजेंद्र पिसे
नातेपुते :भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती तसेच क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांची १९९ वी जयंती श्री दत्त प्रतिष्ठान, नातेपुते यांच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी विविध मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. श्री दत्त प्रतिष्ठान हे वर्षभर महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी निमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या कार्यक्रमास मा. ग्रा. पं. सदस्य समीर सोरटे, नातेपुते प्रेस क्लबचे अध्यक्ष पत्रकार श्रीकांत बाविस्कर, जेष्ठ नेते श्रावण सोरटे, जयंती समिती अध्यक्ष संघर्ष सोरटे, विनोद रणदिवे, प्रकाश साळवे तसेच श्री दत्त प्रतिष्ठानचे प्रकाश पद्मन, रविंद्र ठोंबरे, शिवम उराडे, संजयमामा उराडे, अमित चांगण, कैलास सोनवणे, राहुल सोनवळ, दर्शन उराडे, अभिजित बेंद्रे, किशोर कोल्लाळे, अभिजित पद्मन, रमेश झगडे, अजय सावंत, विजय पिसे व अविनाश लिपारे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे स्वागत अभिजित वाळके यांनी केले.
