पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री म्हणून सुवेंदू अधिकारी यांनी आज शपथ घेतली आहे. पश्चिम बंगालचे भाजपाचे पहिले मुख्यमंत्री ते बनले आहेत.
बंगालचे राज्यपाल आर.एन. रवी यांनी त्यांना मुख्यमंत्री पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली.
या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह एनडीएच्या विविध नेत्यांनी उपस्थिती लावली होती. अधिकारी यांची काल विधिमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली होती.
या नेत्यांनी घेतली मंत्री पदाची शपथ
दिलीप घोष
अग्निमित्र पॉल
अशोक कीर्तनिया
खुदिराम टुडू
निसीथ प्रमाणिक
ममतांना केले पराभूत
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. बॅनर्जी यांना आपली भवानीपूर जागा राखण्यात अपयश आले. या जागेवर भारतीय जनता पक्षाचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी त्यांचा पराभव केला.
निवडणूक आयोगाच्या वेबसाइटनुसार, भवानीपूर मतदारसंघात सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांचा 15,105 मतांनी पराभव केला. सुवेंदू यांनी नंदीग्राममधूनही निवडणूक लढवली होती, तिथेही ते विजयी झाले आहेत.
