
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी :- कोरेगांव तालुक्यांतील करंजखोप गावंचे सुपुत्र आणि पत्रकार क्षेत्रांसह सर्व जिल्ह्यांतील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या परिचित असणारे विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असणारे मा. संभाजी बबनराव पुरीगोसावी यांचा आज दि.२९ एप्रिल रोजी अभिष्टचिंतन सोहळा संपन्न झाला.यावेळी. सर्व जिल्ह्यांतील प्रशासकीय अधिकारीसह तसेच सातारा ,सांगली , सोलापूर,कोल्हापूर , पुणे या जिल्ह्यांतील पोलीस प्रशासन व महसूल विभागाकडुंन यांच्यासह शैक्षणिक राजकीय ,सामाजिक विविध क्षेत्रांतील मान्यवर मंडळी व गोसावी समाजांतील संघटनेचे सर्व पदाधिकारी, मा. जगन्नाथ गिरीगोसावी अध्यक्ष तसेच करंजखोप ग्रामस्थ यांच्यासह गावंचे सरपंच मा. लालासौ नेवसे ग्रामपंचायत सदस्य मा. धनंजय धुमाळ बापू , माजी सरपंच मा. पिलाजी धुमाळ दादा यांच्यासह दैनिक चालू वार्ता ग्रुप कोरेगाव व आम्ही सातारकर ग्रुपमधील सर्व सदस्य ,गावांतील मित्र परिवार तसेच समाज प्रबोधन ह. भ. प सौ.जयश्री ताई तिकांडे यांच्यासह वारकरी संप्रदायातील सर्व मंडळी व पत्रकार क्षेत्रांतील तसेच दैनिक चालू वार्ताचे मुख्यकार्य अधिकारी संपादक डि. एस लोखंड पाटील सर व उपमुख्य कार्यकारी संपादक यांच्यासह सर्व दैनिक चालु वार्ताचे प्रतिनिधी यांनी पुरीगोसावी यांचे विशेष कौतुक करीत शुभेच्छा दिल्या. आपण सर्वांनी अभिष्टचिंतन सोहळा निमिंत्त समक्ष व सौशल मीडिंयाच्या माध्यमांतून शुभेच्छांचा वर्षाव करण्यांत आला.यावेळी पुरीगोसावी यांनी कुटुंबियांच्या वतीने सर्वांचे विशेष आभार मानले.