
दैनिक चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी
गोविंद पवार
नांदेड :- लोकप्रतिनिधीची प्रशासनावर वचक नसेल तर अधिकारी आणि त्यांच्या हाता खालील कर्मचारी कशी अरेरावी करतात एवढेच नाही तर शहरांतील प्रतिष्ठित नागरिकांचा अपमान व एकेरी भाषेचा वापर करून अपमानित करतात याचा अनुभव शहरातील प्रतिष्ठित व्यक्तींना आला. पोलीस ठाण्यात सध्या चहा पेक्षा किटली गरम होताना दिसते . शहरातील सर्वसमावेशक नेतृत्व असलेल्या गटनेत्यास व एका पत्रकारास आला लोह्याच्या बिट चा संबंध नसणाऱ्या एक पोलिसाने मनमानी सुरू केली आहे त्या कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करावी अशी मागणी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी केली आहे.
लोहा शहरात आता कोणाचीची वचक राहिली नाही आमदारांचा संपर्क तसा दुर्मिळच… लोह्याचे कार्यतत्पर पोलीस निरीक्षक संतोष तांबे हे बियाणी हत्या प्रकरणात नांदेड येथेच मागील पंधरा दिवसा पासून तपासात आहेत त्याच्या जागी सहायक पोलिस निरीक्षक शेख याना प्रभार दिला आहे त्यांचे कदम नामक मुन्शी ( रायटर) आहेत. एरवी कधीच पोलीस ठाण्यात न जाणारे गटनेते करीम भाई शेख , नगरसेवक नबी शेख, पत्रकार कदम हे ठाण्यात गेले .
मृदू स्वभाव, मित भाषिक गटनेते यांची लोह्यात व तालुक्यात ओळख त्यांनी जुन्या लोह्यात झालेल्या आपसातील भांडणात समेट होईल काय ?याची विचारपूस पीएसओ यांच्याकडे करीत असतानाच सपोनि शेख यांचे राईटर। जमादार कदम यांनी मध्येच आपला तोरा दाखवत गटनेते व नगरसेवक यांच्याशी एकेरी भाषा वापरली एवढेच नाही वाटेल ते बोलत सुटले.
असे छप्पन पत्रकार पाहिले असे हे महाशय बोलले हे सगळे प्रभारी असलेले सहायक पोलिस निरीक्षक शेख यांच्या समक्ष घडले पण ते काहीच बोलत नव्हते शहरातील प्रतिष्ठीत व्यक्तींचा अपमान केले व एकेरी भाषा वापरीत पाहून घेतो असा खाकीचा रुबाब दाखविला. या राईटर च्या वागणुकीचा पोलीस कर्मचारी त्रस्त झाले आहेत .गटनेत्यासह नगरसेवक यांच्या सोबत या कर्मचाऱ्याने विनाकारण वाद घेतला . ठाण्यात अनेक कर्मचारी नवीन आले आहेत त्यांना शहरातील सामाजिक सलोखा कसा आहे हे अद्याप कळले नाही.विनाकारण काही जण खाकीचा ढोस दाखवीत वातावरण गढूळ करीत आहेत. अनेक कर्मचारी या शहरातून बदलून गेल्या नंतरही त्यांचे येथील नागरिकांशी अंत्यत सलोख्याचे व कुटुंबिक संबंध राहिले आहेत.
कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संतोष तांबे नसल्याचा गैरफायदा काही जण घेत आहे या सगळ्या प्रकरणाची खा. चिखलीकर यांनी दाखल घेत संबंधितांना चांगलेच सुनावले आहे. चहा पेक्षा किटली गरम हे पोलीस व जनता यातील सलोखा कायम ठेवण्यासाठी उपयुक्त नाही या सगळ्या प्रकरणाची शहरात चर्चा सुरू असून त्या कर्मचाऱ्यांची बदली करा व त्यावर कार्यवाही करावीं जनतेच्या प्रतिनिधींना जर अशी एकेरी व अपमानास्पद वागणूक मिळत असेल तर सामान्य माणसाचे काय ? असा सवाल उपस्थित होत आहे शहरातील सर्व पक्षीय शिष्टमंडळ लवकरच या प्रकरणात जिल्हा पोलिस अधीक्षक याना भेटणार आहेत. प्रभारी अधिकारी शेख आपल्या च तोरात दिसत आहेत त्यामुळे पोलिस स्टेशन चा कारभार ढेपाळला असुन त्याकडे वरीष्ठाने लक्ष देऊन प्रभारी अधिकारी हटाव ची मागणी होत आहे.