
दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी – शाम पुणेकर.
पुणे : माझा रस्ता चुकतोय, असं काही नाही. ज्यावेळी तुमचा संघर्ष होत असतो, तुमच्या मागे कोणीतरी बोलतं, टिका करते व अडचणी येतात, तेव्हा तुम्ही असे समजयाचे की तुम्ही योग्य मार्गावर आहात. तुम्ही त्यातले रस्ता बदलाल हे वाक्य घेता. पण, मी राज मार्गावर आहे आणि राहणार, अशी भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते वसंत मोरे यांनी मांडली.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे याबाबत आंदोलन पुकारल्यानंतर मनसेचे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर आणि वसंत मोरे “नॉट रिचेबल’ होते. त्यावर साईनाथ बाबर यांनी कालच भूमिका मांडली. तर, वसंत मोरे यांनी फेसबुकवर पोस्ट टाकली, त्यानंतर आज ते पत्रकारांसमोर आले. त्यांनी पत्रकारांना सांगितले की, अक्षय्य तृतीयेच्या दिवशी तिरुपती बालाजी येथे मी गेली १७ ते १८ वर्ष नित्यनेमाने दर्शनाला जातो आहे. मी तिरुपतीचे बुकिंग करून ठेवले होते. तसेच, आंदोलना दरम्यान मनसेचे सर्व नेते माझ्या संपर्कात होते. त्यामुळे मी बालाजी दर्शनाला गेलो. कारण, याआधी घरी कार्यक्रम असतानाही राज साहेबांच्या सभेला उपस्थित होतो.