
दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी – शाम पुणेकर.
पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुस्लीम बांधवांना मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी ३ मे पर्यंतची मुदत दिली होती. तसं न झाल्यास मशिदीसमोर हनुमान चालीसा लावण्याचं आवाहन कार्यकर्त्यांना त्यांनी केलं होतं. त्यानुसार मनसे कार्यकर्ते राज्यभरात आक्रमक झाले आहेत. परंतु पुण्यातील सर्व मुस्लिमांनी राज ठाकरेंच्या इशारेकडे दुर्लक्ष करून भोंगे न उतरविण्याबाबत ठाम रहाण्याच्या निर्णय घेतला आहे. कसबा पेठेतील काही मुस्लिम कार्यकर्त्यांशी संवाद साधला असता ते म्हणाले की, ३ मेच्या दिवशी सकाळी ६ वा. आम्ही भोंग्यावर अजाण दिली नाही; परंतु दिवसभरातील इतर अजाणसाठी भोंग्यांचा वापर केला. आम्ही सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आदेशानुसार नियमीत पालन करतो. बाकी एक काय असे शंभर राज ठाकरे आडवे आले तरी आम्ही त्यांना जुमानणार नाही.