
दैनिक चालु वार्ता निरा नरसिंहपुर प्रतिनिधी -बाळासाहेब सुतार
पिंपरी बुद्रुक येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे मतदान सकाळी 8:०० वाजल्या पासून ते दुपारी11:45 पर्यंत शेतकरी मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दुपारपर्यंत 60%(साठ टक्के) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे मतदारांनी सकाळ पासूनच आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी हजेरी लावली.
सदर पिंपरी बुद्रुक येथील विकास सेवा सहकारी सोसायटीला शेतकरी सभासद, पिंपरी बुद्रुक ,गिरवी ,नरसिंहपूर , टणु, गोंदी, ओझरे, लुमेवाडी, आशा एकूण सात गावातील 1150 सभासदांचा समावेश आहे. त्यापैकी 856 सभासद मतदानास पात्र आसुन मतदार आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत.
सदर निवडणुकीमध्ये दोन पॅनल आसुन प्रत्येकी 13 उमेदवार आमनेसामने आहेत,
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शना खाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून माजी आदर्श सरपंच श्रीकांत बोडके यांचा राष्ट्रवादी पक्षाचा पॅनल आहे तर त्यांचे प्रतिस्पर्धी माजी सहकार मंत्री हर्षवर्धनजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साखर कारखान्याचे संचालक संजय बोडके भारतीय जनता पार्टी असे दोन पॅनल आमने-सामने उभे आहेत, कोण बाजी मारणार याकडे या भागाचे लक्ष लागलेले आहे.
मतदानाचा अंतिम कौल आज संध्याकाळी मतमोजणी नंतरच स्पष्ट होईल.