
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी-गोविंद पवार
सुदैवाने कसल्याच प्रकारची हानी नाही जनतेचे आशिर्वाद कायम पाठीशी- भिमाशंकर मामा कापसे
लोहा : – लोहा कंधाराचे लाडके व आझाद ग्रुपचे अध्यक्ष भिमाशंकर मामा कापसे हे गुरूवारी रात्री पुण्याकडे जात असताना बिड जिल्ह्यातील सिरसाळा या ठिकाणी सुमारे २ वाजता त्यांचा गाडीला अपघात झाला सुदैवाने कुठल्याही प्रकारची हानी झाली नसुन ते पुणे येथे सुखरूप पोहचले असून माझ्या सर्व मित्र परीवारांनी कसल्याच प्रकारची काळजी करू नये असे त्यांनी सांगितले आहे.
कोरोना काळात पुणे येथे गोर गरीब जनतेला अन्न धान्य वाटप , कंधार लोहा तालुक्यातुन पुणे येथे कामासाठी गेलेल्या व्यक्तीला अहोरात्र मदत करणे जन्मभूमीकडे अन्नदान , रक्तदान , कोव्हीड योध्दा सन्मान , महिलांना पुरस्कार , सामाजिक कार्यक्रमात सतत कार्यरत असल्याने कमी कालावधीत आझाद ग्रुपचे अध्यक्ष भिमाशंकर मामा कापसे यांची लोकप्रियता वाढली असुन सध्या लोहा कंधार तालुक्यात भिमाशंकर मामा कापसे यांच्याच नावाचा बोलबाला ऐकावयास मिळत आहे.
गुरूवारी पुण्याकडे जात असताना माझ्या गाडीला अपघात झाला त्या अपघातात कसल्याच प्रकारची हानी झाली नसुन माझ्या सोबत लहान थोर जनता जनार्दनांचे आशिर्वाद पाठीशी आहेत.
– भिमाशंकर मामा कापसे
अध्यक्ष – आझाद ग्रुप महाराष्ट्र राज्य