
दैनिक चालु वार्ता नीरा नरसिंहपूर प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार,
नीरा नरसिंहपूर तालुका इंदापूर येथील माजी विद्यमान उपसरपंच विलास दत्तात्रय ताटे- देशमुख यांची भारतीय जनता पार्टीच्या सचिव पदी निवड करण्यात आली. निवडीचे पत्र माजी सहकार मंत्री हर्षवर्धनजी पाटील साहेब व तालुका आध्यक्ष शरद जामदार यांच्या हस्ते देण्यात आले. व विलास ताटे यांना पुढील वाटचालीस आशीर्वाद व शुभेच्छा दिल्या. निवडीनंतर विलास ताटे बोलत आसताना म्हणाले की इंदापूर तालुक्यामध्ये सर्वसामान्य जनता युवक वर्ग पक्षाचे कार्यकर्ते व तळा गळातील सर्वसामान्य जनतेच्या संपर्कात राहून आपल्या भारतीय जनता पक्ष वाढविण्यासाठी इंदापूर तालुक्यामध्ये प्रयत्नशील राहील तसेच माझी निवड माजी सहकारमंत्री हर्षवर्धनजी पाटील साहेब, तालुका आध्यक्ष शरद जामदार, यांच्या हस्ते झाल्यामुळे मी त्यांचा कधीच विसर पडू देणार नाही.
तालुक्यातून निवडीसाठी आनेक भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक संजय बोडके, संचालक बाळासाहेब मोहिते, माजी सरपंच संतोष मोरे, माजी सरपंच आण्णासाहेब काळे, यांनी देखील या निवडी बद्दल मा. सरपंच विलास ताटे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.