
दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी – शाम पुणेकर.
पुणे : महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्व आदरणीय पु.ल. देशपांडे यांच्या कल्पनेतून ५४ वर्षांपूर्वी बांधलेलेले बालगंधर्व रंग मंदिर आहे. ह्या नाटय़गृहात रसिक पुणेकरांनी विविध नाटकांचे “हाऊस फुल्ल” चे बोर्ड पाहिले. बदलत्या परिस्थिती नुसार मनपसंत गाण्यांचे आॅर्केस्ट्रा, चटकदार लावण्याचे शोज व विविध मनोरंजनाचे कार्यक्रमांचा आस्वाद घेतला आहे. हे रंगमंदिर अल्पावधीतच आशिया खंडात अव्वल दर्जाचे ठरले आहे.आधुनकतेची आस असणाऱ्या पुणेकरांसाठी हे बालगंधर्व रंगमंदिर नव्याने उभारण्याची, व्यापक करण्याची गरज असल्याचेही लक्षात आले. ही बाब लक्षात घेऊन २०१८ साली मुरलीधर मोहोळ यांनी स्थायी समितीचे अध्यक्ष असताना बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासाची संकल्पना मांडली आणि अंदाजपत्रकात त्यासाठी तरतुदही केली. मात्र कोरोनामुळे दोन वर्षांच्या कालावधीमधे हा विषय बाजूला राहिला होता. मात्र आता पुन्हा या कामाला गती मिळाली आहे. हे काम अतीशय सुंदर व कौशल्यपूर्णपणे पूर्ण करून हे रंगमंदिर नव्या दिमाखात सादर होणार आहे