
दैनिक चालु वार्ता भिगवन प्रतिनिधि: जुबेर शेख
भिगवन :डिकसळ (ता. इंदापुर )येथील सुनील काळे यांची भारतीय जनता पार्टी च्या उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते सुनील काळे यांना निवडीचे पत्र देण्यात आले.
डिकसळ गावातील हर्षवर्धन पाटील यांचे अत्यंत विश्वासु शिलेदार म्हणून सुनील काळे यांना ओळखले जाते. डिकसळ मधील युवकांची भक्कम फळी आणि कोणत्याही प्रसंगी समोरच्याला थेट भिड़ण्याची तयारी या त्यांच्या जमेच्या बाजु आहेत. त्यांचा निवेडीने त्यांच्यावर सर्व स्तरातून सुभेच्छाचा वर्षाव होत आहे.
राज्याचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिति निवडनुकी मधे पक्षा ला यश मिळवण्यासाठी तसेच पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणार असल्याचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष सुनील काळे यांनी सांगितले.