
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी वाडा तालुका- मनिषा भालेराव
डाहाणू तालुक्यातील दिवशी पाटील पाडा येथिल आदिवासी समाजातील पिडित कुंटूबानी पालघर जिल्हा काँग्रेस कमिटीचे चिटणीस अनंता वनगा यांच्याकडे केली न्यायाची मागणी
पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आदिवासी मजुरांना आपल्या कुटुंबाचे उदारनिर्वाह व पालनपोषण करणेसाठी आपले राहते घर/गाव सोडून शहराकडे वाटचाल करतात व जे जमेल ते काम करतात,असेच एक डहाणू तालुक्यात दिवशी पाटीलपाडा येथील रहिवासी असलेले आदिवासी कुटुंब मोलमजुरी करणारे स्थलांतरीत होवून मिळेल ते काम करुन आपल्या कुटुंबाचा उदारनिर्वाह करणेसाठी भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी येथे आकलोली काॅलनी मध्ये काही महिन्याआधी आले होते व दिवसभर जे काम मिळेल ते रोजंदारीवर करत होते त्यातच वज्रेश्वरी येथे मोठी यात्रा भरते(दि २/५/२०२२ रोजी )रात्री काशिनाथ गवा हे आपल्या पत्नी व मुलांना घेवुन यात्रा बघण्यासाठी गेले होते व पुन्हा यात्रा बघून आकलोली काॅलनी कडे रस्त्यांच्या बाजूला चालत असताना पाठीमागून भरघाव वेगाने आलेल्या पिकअपने या गोर गरिब मजुरांना गाडिखाली चिरडले,या भयंकर अपघातात कुटुंब प्रमुख काशिराम गवा वय वर्ष ४२ यांचा जागीच मृत्यू झाला
त्याची पत्नी राशी गवा वय वर्ष ४०
,कु सुनिता गवा वय १२ वर्ष,
कु प्रनित गवा वय ९ वर्ष,
श्रीम संती भावर वय ४८ वर्ष हे सर्वजण गभीर जखमी झाले होते,अपघाताची बातमी कळताच स्थानिक रहिवाशींनी या मजुरांना मदत करुन भिवंडी येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी भरती केले परंतू ज्या गाडीने अपघात झाला ती गाडी व गाडीचा चालक पळून गेले,परंतू गणेशपुरी पोलिसांनी रस्त्याला असणारे cctv फुटेज चेक करुन गाडीचालक व गाडी ताब्यात घेतली,व पुढील चौकशी व कार्यवाही पोलिस करत आहेत.
सदर या कुटुंबाचा कर्ता पुरूषाचे अपघातात जागेवरच मृत्यू झाला त्यामुळे काहीतरी भरपाई मिळेल म्हणून दिवशी गावातीलच माजी सरपंच रमेश भावर यांनी पालघर जिल्हा काॅग्रेस कमिटीचे चिटणीस अनंता वनगा यांना लेखी पत्र देवून न्यायची मागणी केली आहे
तसेच अनंता वनगा यांनी लगेचच गणेशपुरी पोलिस स्टेशनचे राजेद्रजी शेंडे मेजर यांच्याशी संपर्क साधून आज दि ९/५/२०२२ या दिवशी पाटील पाडा येथे राहत्या घरी जावून गवा कुटुंबाची भेट घेवुन मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली व जी काही मदत करता येईल ती करू असे सांगितले