
दैनिक चालु वार्ता पुणे जिल्हा-गुणाजी मोरे —————————————-
पुणे : देशामध्ये भारतीय जनता पार्टी सरकारच्या विरोधात विविध ठिकाणी आंदोलनाचे मालिका चालू आहे. त्यातच आज काल दिनांक 13 मे रोजी फुरसुंगी चौकात
शिवसेना शाखेच्यावतीने आज महागाईच्या विरोधात चूल जलाव आंदोलन करण्यात आले .
यावेळी पुरंदर तालुका शिवसेनाप्रमुख प्रमुख शंकर नाना हरपळे बोलत होते ते म्हणाले की मोदी सरकारने हे सरकार निवडून आल्यानंतर महागाई कमी करण्या साठी मोठी आश्वासने दिली होती. आणि त्याच आशे पोटी जनतेने मोदी सरकारला निवडून दिले पण मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून महागाईचा आलेख वाढतानाच दिसतो आहे. कुठेही कमी होताना दिसत नाही. आज पेट्रोलचे दर 123 प्रति लिटर रुपयापर्यंत गेल आहेत. गॅस सिलेंडर 1000 रुपयाच्या वर प्रति सिलेंडर डर मोजावे लागते. बाजारातील भाजीपाल्याचे ही दर वाढलेले आहेत आणि जीवनावश्यक वस्तू सुद्धा महाग झाले आहेत अशातच सामान्य माणसाने जगायचे तरी कसे ? हा प्रश्न जनतेसमोर पडला आहे असे शंकर नाना हरपळे यावेळी ते बोलत होते.
यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी तसेच महिला कार्यकर्ता उपस्थित होत्या.