
दैनिक चालु वार्ता अक्कलकुवा प्रतिनिधी- आपसिंग पाडवी
धडगाव ता.१३ तालुक्यातील बिजरी येथे आदिवासी जननायक बिरसा मुंडा सार्वजनिक वाचनालच्या वतीने बिजरी येथे सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा व कॅरिअर निवड विषयक मार्गदर्शन शिबीर १० मे रोजी राबविण्यात आला.
सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षे करिता सुमारे २०० च्या पेक्षा अधिक शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. दरवर्षी प्रमाणे ह्या परीक्षेचे नियोजन निसर्गाच्या सानिध्यात महूच्या झाडाखाली घेण्यात आली.या परीक्षे करिता तीन गट करण्यात आले.प्राथमिक,माध्यमिक,वरिष्ठ गट ठेवण्यात आला.यात प्राथमिक गटात प्रथम क्रमांक – अंजली किसन पावरा(बिजरी), द्वितीय क्रमांक खुशी अमरसिंग वसावे(काकरपाटी), तृतीय क्रमांक कमलेश जंगलसिंग पटले (बिजरी), सुजल राजेंद्र पटले (बिजरी), माध्यमिक गटात प्रथम क्रमांक गणेश सुभाष वसावे (बिजरी), द्वितीय क्रमांक वर्षा पिंट्या पावरा (भोगवाडे), तृतीय क्रमांक अभिजीत दामोदर पावरा(रोषमाळ), तर वरिष्ठ गटात प्रथम क्रमांक निलेश चिणक्या पावरा (बोरद), द्वितीय क्रमांक दिनेश जान्या वसावे (बिजरी), तृतीय क्रमांक राकेश दोहाण्या पावरा(रोषमाळ)या विद्यार्थ्यांनी यश मिळवले. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून श्री.डॉ.मोहन पावरा सर (एस.एस.व्ही.पी.एस. कॉलेज धुळे, सिनेट सदस्य उमवि, जळगाव) हे लाभले.यावेळी मार्गदर्शन करतांना शिक्षणाने आपण आपला समाज, आपला देश घडवू शकतो. आपण अपयशी झालो तरी जीवनात खचून जायचे नाही,आppत्मविश्वासाने पुन्हा संकटावर मात करून पुढे जायचं असतं असे प्रेरणादायी वक्तव्य त्यांनी केले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री. आपसिंग वसावे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी संकटावर मात करून पुढे जायचं असतं. विद्यार्थ्यांनी व्यसनापासून दूर रहावे. लहान वयातच आपले ध्येय निश्चित करावे. सामाजिक माध्यमे आणि तंत्रज्ञानाचा शैक्षणिक वापरासाठी जास्तीत जास्त वापर करावा असे त्यांनी आवाहन केले. आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक श्री. अनिल वसावे यांनी त्यांच्या आत्तापर्यंतच्या गीर्यारहण प्रवासातील अनुभव व यशस्वी मोहिमा बद्दल सांगितले. श्री. योगेश मराठे यांनी आदिवासी विद्यार्थ्यांत खूप क्षमता असतात. आपली क्षमता ओळखून आपले ध्येय निश्चित करावे असे सांगितले.
तर बिजरी गावातील सेवानिवृत्त कर्मचारी यांचाही सत्कार करण्यात आला. यात श्री.जंगलसिंग वसावे(पोलीस) यांनी सर्वांचे आभार मानुन आपले मनोगत व्यक्त केले. श्री. बन्सिलाल वसावे(सैनिक) यांनी देश सिमेवर कर्तव्य बजावतांनाचे अनुभव सांगितले. त्यांनी देशभक्तीपर संदेश दिला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सोना पटले, सिंगा पटले, चंद्रसिंग पटले, संदिप पटले आदींसह वाचनालयाच्या व युवा टिमने तसेच गावातील सर्व नागरिकांनी सहकार्य केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. दिलीप पटले यांनी केले. तर आभार महेंद्र वसावे यांनी मानले.