
दैनिक चालू वार्ता कोरेगांव प्रतिनिधी -संभाजी गोसावी
करंजखोप न्यू इंग्लिश स्कूल शारदाबाई गोविंदराव पवार विद्यालय मध्ये वर्गमित्र गुरुवर्य यशस्वी विद्यार्थी विद्यार्थिनींचा स्नेहमेळावा उत्साहांत संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे उद्योजक सन्मानीय मा.डॉ. लालासाहेब शिंदे मा.चव्हाण मॅडम शारदाबाई विद्यालयांचे प्राचार्य मा.लावंड सर या संदीप धुमाळ (माजी सरपंच)मा. राजेंद्र नेवसे तसेच आजी माजी सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी व शारदाबाई गोविंदराव पवार विद्यालयांचे सर्व सहकारी कर्मचारी वर्ग यांचे उपस्थिंतीत यशस्वी विद्यार्थी व विद्यार्थिनींना स्नेहमेळावा उत्साहांत संपन्न झाला. यावेळी उद्योजक माननीय डॉ. लालासाहेब शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आपल्या लहानपणाची आठवण आणि त्यांच्या शालेय शिक्षणाबाबत जुन्या गोष्टींना त्यांच्या या मनोंगतातून उजाळा मिळाला.विद्यालयांचे प्राचार्य मा. लावंड सर मा.संदीप धुमाळ( माजी सरपंच ) मा.चव्हाण मॅडम आदीं मान्यवरांनी वर्गमित्र गुरुवर्य यशस्वी विद्यार्थी व विद्यार्थिनीच्या स्नेहमेळावा प्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले. व तसेच आजी-माजी विद्यार्थी विद्यार्थिनींनी आपले थोडक्यांत मनोंगत व्यक्त केले. सर्व आजी माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी एकत्रित आल्यांमुळे त्यांच्या जुन्या गोष्टींना आणि आपण या शाळेमध्ये शिकलो असल्यांची त्यांना आठवण झाली. कार्यक्रमाप्रसंगी उपस्थिंतीत असणाऱ्या आणि करंजखोप गावचे सुपुत्र सातारा जिल्ह्यांचे कर्तव्यदक्ष पत्रकार संभाजी पुरीगोसावी यांचाही मा.संजय वाघ सर मा.राजेंद्र धुमाळ यांच्या वतीने शाल श्रीफळ, बुके देऊन भव्य स्वागत करण्यांत आले यावेळी पुरीगोसावी प्रमुख मान्यवरांचे व आजी-माजी विद्यार्थी व विद्यार्थिनीचे आभार मानले. संदीप धुमाळ( माजी सरपंच )यांनी सर्वांचे आभार मानले व सर्व आजी-माजी विद्यार्थी विद्यार्थिनींना स्नेह भोजनांची व्यवस्था शारदाबाई गोविंदराव पवार विद्यालयांमध्ये करण्यांत आली होती.