
दैनिक चालू वार्ता भुम तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
भुम:- तालुक्यातील आष्टा येथे श्री.तुळजाभवानी मंदिर,श्री.रेणुका देवी मंदिर,श्री.येडेश्वरी देवी मंदिर व श्री.विठ्ठल-बिरुदेव मंदिर या सर्व मंदिरांच्या कलशारोहण याचा कार्यक्रम काल संपन्न झाला या कार्यक्रमा च्या निमित्ताने गावातील सर्व गावलेकींना माहेरचा आहेर आष्टा गावचे सुपुत्र पिंपरी चिंचवड मनपाचे नगरसेवक श्री.बापू शेठ घोलप यांच्यातर्फे देण्यात आला या कार्यक्रमामध्ये अन्नदानाचे पवित्र काम श्री.पितांबर नाना गिलबिले व श्री.विकास शेठ घोलप यांच्यातर्फे झाले तसेच सर्व मंदिराच्या कळसाला सोन्याचे कोटिंग श्रीमती हिराबाई सूर्यभान गिलबिले यांनी केले,मंदिराच्या समोरील पिवर ब्लॉक चे काम श्री.आनंदराव आप्पासाहेब सूर्यवंशी यांनी केले, श्री संत बाळूमामा चे मंदिर श्री.हरिदास किसन लोंढे यांच्यातर्फे साकारले, श्रीरेणुका देवीच्या मंदिरावरील शिखराचे काम श्री.बालाजी दत्तात्रय गिलबिले यांनी केले आणि रात्री महाराष्ट्राचे महागायक श्री.चंदनजी कांबळे यांच्या सुमधुर गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता याचे यजमान श्री.दिपक शेठ खंडाळकर हे होते.
या भव्यदिव्य कार्यक्रमाच्या निमित्ताने एका चांगल्या शुभकार्याचा आरंभ म्हणून आपल्या गावच्या सौंदर्यासाठी आणि विकासासाठी पहिले पाऊल म्हणून हनुमान मंदिरासमोरील गावच्या वेशीचे अर्थात प्रवेशद्वाराचे बांधकाम वै. अभिमान बाबुराव घोलप यांच्या स्मरणार्थ श्री.बापूशेठ अभिमान घोलप यांच्यातर्फे केले जाणार आहे म्हणून आष्टा गावचे ज्येष्ठ नागरिक पुण्यातील सुप्रसिद्ध व्यापारी श्री.पोटटलाल शेठ गुगळे यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आले,लवकरच या प्रवेशद्वाराच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे अशी ग्वाही श्री.बापूशेठ घोलप यांनी सर्व गावकऱ्यांना दिली आहे या कार्यक्रमासाठी मा.आ.राहुल भैया मोटे,जय हनुमान ग्रुप चे श्री.सुरेश भाऊ कांबळे,भूमच्या नगराध्यक्षा सौ.संयोगिता ताई गाढवे,आण्णासाहेब पाटील आरसोलीकर,राहुल पाटील देवळालीकर,मंगेश सस्ते कानडीकर आष्टा गावचे सरपंच सुनीलजी जाधव,तात्यासाहेब आष्टेकर,रवींद्र वाघमारे,संभाजी गिलबिले,तुकाराम कवडे,संभाजी नलवडे,धनंजय पाटील,किरण पापा गिलबिले,तानाजी गिलबिले,पंजाबराव गिलबिले,प्रदीप भैय्या काकडे,बिबीशन महाराज गिलबिले,रावसाहेब माळी,विजय दौंडे,रणजीत अनभुले,निलेश मुळे,अभिजीत काकडे,राजेश सोळस्कर आदी मान्यवर उपस्थित होते.हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गावातील सर्व तरुण मंडळींनी खूप मोठे कष्ट घेतले तसेच सर्व गावकऱ्यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तन-मन-धनाने सहकार्य केले.