
दैनिक चालु वार्ता विशेष प्रतिनिधी सांगली- निरज तांडेल
सांगली : कोल्हापूर रोड सांगली येथील कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था, मर्या सांगली यांच्या नुतन मुख्य कार्यालयाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्थेची इमारत ही अत्यंत देखणी उभारण्यात आली असून ती सांगली शहराच्या वैभवात भर घालेल. सहकारी आर्थिक संस्था चांगल्या चालण्यासाठी आरबीआयचे यापुर्वी ठेवीवर १ लाख रुपयाचे विमा संरक्षण मिळत होते ते आता ५ लाख रुपयांपर्यंत वाढवले आहे. याच धर्तीवर राज्यात पतसंस्थांमधील ठेवीवर किती प्रमाणात विमा संरक्षण देता येईल याबाबत लवकरच धोरण ठरवण्यात येणार आहे. संपुर्ण सहकार क्षेत्रासमोरच अनेक अडचणी आहेत. तरी सुध्दा या सर्व अडचणींवर मात करून सहकार पुढील वाटचाल करीत आहे. सहकाराच्या सक्षमीकरणासाठी शासनही पुढाकार घेत आहे. वेगवेगळ्या उपाया योजना राबवत आहे. सहकारी संस्था योग्य चालण्यासाठी संस्थेतील संचालकांचा कार्यभारही तितकाच महत्त्वाचा आहे. त्यामुळे संचालकांनी आपल्या सभासदाचं व संस्थेचं हित डोळ्यासमोर ठेवून कारभार करावा. येत्या काळात सहकार क्षेत्र अधिक लोकाभिमुख व पारदर्शी करावं त्यामध्ये व्यवसायिकता यावी व आधुनिकीकरणाचा अवलंब करावा. यामध्ये डीजिटल माध्यमातून ग्राहकांना घरबसल्या बँकिंगसेवा उपलब्ध करून द्याव्यात. याबाबत शासन नेहमीच सहकारी संस्थांच्या पाठीशी राहील. या पतसंस्थेच्या जवळपास ५१ शाखा कार्यरत आहेत. आता आणखीन १० शाखा सुरु होणार आहेत. या संस्थेतून चालणारा कारभार कर्मवीर आण्णांच्या नावाला शोभेल अशा पध्दतीचं आहे.