
दैनिक चालु वार्ता सांगली विशेष प्रतिनिधी-निरज तांडेल
सांगली : सांगली येथील नेमिनाथ नगरमध्ये दक्षिण भारत जैन सभेचे १०० वे महाअधिवेशन (त्रैवार्षिक) संपन्न झाले. विकासाच्या वाटेवर घेऊन जाण्यासाठी जैन समाजाला जे-जे देता येईल ते-ते देण्याचा प्रयत्न केला जाईल, यासाठी राज्य शासन यत्किंचितही कमी पडणार नाही, अशी ग्वाही यावेळी दिली. अहिंसा परमोधर्म, जगा आणि जगू द्या, या तत्त्वांचं आचरण करून संस्कृतीशी एकरुप झालेला जैन समाज आहे. सामाजिक भान जपणाऱ्या जैन समाजाच्या मागण्या, प्रलंबित प्रश्न प्राधान्यानं सोडवले जातील. सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या जैन समाजानं दातृत्वातून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. समाजाचे असणारे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्व संबंधितांची मुंबई येथे बैठक घेऊन समाजाचे प्रश्न समजावून घेऊन ते मार्गी लावले जातील. जात-पात, धर्म यापेक्षा माणुसकीचा विचार मोठा आहे. मानवधर्माचा विसर कोणालाही पडू नये यासाठी जैन धर्माचे विचार आणि आचार आचरणात आणणं गरजचं आहे. जैन समाजाचे या विचारानेच कार्य होत आहे. सर्वांचं हित साधून प्रत्येक संकट काळात मदतीसाठी पुढे येणाऱ्या या समाजाला शासनही सर्वोतोपरी सहकार्य करील. जैन समाजाच्या विकासासाठी अन्य राज्यात राबवण्यात येत असलेल्या योजनाही महाराष्ट्र राज्यात राबवून या योजनांचा लाभ जैन समाजाला मिळवून दिला जाईल. दक्षिण भारत जैन सभा समाजाच्या न्याय हक्काचा लढा सांविधानिक मार्गानं पुढे घेऊन जाण्याची भूमिक बजावेल, असा विश्वास आहे. जैन समाजाचे आचार-विचार, त्यांची परोपकार भावना, मानवता, उद्यमशीलता, शिक्षण तसंच निरोगी आरोग्याची सवय इतर समाजानंही अंगिकृत करावी, असं आवाहन आहे.