भाग्यनगर (तेलंगाणा) – राज्यातील रंगारेड्डी जिल्ह्यातील तुक्कुगुडा येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एका सभेला संबोधित केले.
ते म्हणाले की, राज्यात भाजपची सत्ता आल्यास आम्ही मुसलमान आणि अन्य धार्मिक अल्पसंख्य यांना देण्यात येणारे आरक्षण रहित करू. यामुळे सामाजिकदृष्ट्या मागास असलेल्यांना त्याचा लाभ होऊ शकेल.
शहा पुढे म्हणाले की, तेलंगाणातील टी.आर्.एस्. सरकार भ्रष्ट आहे. त्यांनी निवडणुकीपूर्वी मतदारांना दिलेल्या एकाही आश्वासनाची पूर्तता केलेली नाही. तेलंगाणामध्ये पुढील वर्षी निवडणूक असून या निवडणुकीला सामोरे जाण्यास भाजप सिद्ध आहे.
