
जीवनात अनेक संकटं,वादळ, समस्या वारंवार नित्य येणार या मध्ये काही दुमत नाही. परंतु आपल्या कडील उपलब्ध ज्ञानाचा ब्रह्मास्त्र म्हणून वापर करता आला पाहिजे आणि संकटाला उत्तम संधीत परिवर्तित करता येण्याची कला.क्षमता , शक्ति ताकद म्हणजे यशस्वी जीवन होय . आणि यासाठी आवश्यक ते ज्ञान आपण जीवनाच्या विविध टप्प्यांवर आवश्यकतेनुसार अर्जित केले पाहिजे .विविध संकटं,वादळ, काठीण प्रसंग यांचा संगम म्हणजे जीवन .अखंड संघर्षाची मालिका हिच जीवनाची खरी ओळख असते . मुळात अडचण हिच आहे हे सर्व गणित समजलं पाहिजे. संकटाला उत्तम संधीत परिवर्तित करता येण्याची काला म्हणजे यशस्वी जीवन. यशस्वी जीवन म्हणजे फार काही वेगळं नसतं . म्हणुन वेळेवेळी येणार संकटं संधीत परिवर्तित करता आलं पाहिजे. वास्तविक निसर्ग कडुन आपल्याला घडविण्यासाठीच आपल्या समोर वेगवेगळी संकट अडचणी उभा राहत असतात .परंतु संकट, अडचणी, समस्या, वादळं हि आपल्याला अडविण्यासाठी दुःख देण्यासाठी कधीच आलेली नसताना. आपल्याला दुःखी कमजोर करणे हा निसर्गाचा हेतु कधीच नसतो . समस्या अडचण आपली आहे .आपण संकट,वादळ , समस्या यांना घाबरतो .दुःखी होतो खचुन जातो . म्हणुन खरी समस्या इथंच आहे .न घाबरता न दुःखी होता न ताण ,तणाव घेता चिंता न करता जीवनातील कोणतंही संकट हे आपल्याला रडविण्यासाठी नाही तर सहाजिकच आपल्याला घडविण्यासाठी आलेलं असतं .हे समजणं खुप महत्वपूर्ण आहे . संकटाला निसर्गाचे निमंत्रण समजुन ज्यांनी, ज्यांनी आपल्या जीवनात संकटाला उत्तम संधीत परिवर्तित केले. ते सर्व महामानव झाले . यशस्वी झाले समाजासाठी आदर्श ठरले . आपण छोट्या छोट्या गोष्टी, समस्या, संकटं आल तरी तणाव घेत़ो.कारण हि खुप छोटी छोटी असतात .त्याच वास्तविक मुल्य काहीच नसतं. परंतु आपण ते समजूत घेत नाही. म्हणून गल्लत होते आणि आपल्या जीवनात दुःखाची उत्पत्ती होते. वास्तविक दुःख हे नाहीच मुळी आपल्या मन सारखी घटना घडली किंवा आपल्या मनाला अनुकूल अस घडल कि आपण आनंद समजतो . आणि मनाच्या विरूद्ध घटना घडली किंवा मनाला प्रति कुल अशी घटना घडली कि आपण दुःखी होतो खिन्न होतो तणाव घेतो .आणि याला आपण दुःख समजतो . वास्तविक असं नाही संकटं समस्या अडचण हि प्रत्येकाला आहे आणि येणारच मात्र अडचण समस्या आणि संकट याच स्वरूप व्यक्ति परत्वे वेगळं असेल .परंतु असणार हे निश्चित या मध्ये काही शंका कुशंका नाहीच. परंतु आपल्या कडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ज्ञान साठा किती उपलब्ध आहे. यावरून त्या संकटाचा समाना करण्याची ताकद शक्ती क्षमता निर्धारीत होत असते . म्हणुन संकट मोठं आहे कि छोटं हे आपल्या ज्ञानावर ठरत . संकटाला निसर्गाचे निमंत्रण समजुन आपल्याकडील ज्ञानाचा ब्रह्मास म्हणून वापर करा .आणि संकाटाला उत्तम संधीत परिवर्तित करता आलं म्हणजे जीवन यशस्वी झाला
गणेश खाडे
संस्थापक वंजारी महासंघ महाराष्ट्र
वंजारी समाज ईतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर अध्यात्मिक मार्गदर्शक