
दैनिक चालू वार्ता गंगापूर प्रतिनिधी -सुनिल झिंजूर्डे पाटिल
गंगापूर तालुक्यातील दायगाव येथील कोमल नारायण पवार (वय वर्ष 21 ) या युवतीने गुरुवारी 17 मे ला विषारी औषध प्राशन करुन आपली जीवनयात्रा संपवली.
याबाबतची अधिक माहिती अशी की दायगाव येथील कोमल नारायण पवार या युवतीने विषारी कीटकनाशक औषध पिऊन आत्महत्या केली. उपचारकामी कोमल हिस लासूरच्या प्राथमिक केंद्रात आणले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले
दरम्यान विशेष म्हणजे याबाबतची खबर शिल्लेगाव पोलिसांना प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी सूर्यवंशी यानी दिल्यावरून अनैसर्गिक मृत्यूची नोंद शिल्लेगाव पोलिसांनी केली आहे.