
दैनिक चालू वार्ता वाडा तालुका प्रतिनिधी- मनिषा भालेराव
…………………….,……………
वीटभट्टीवर काम करणाऱ्या एका अशिक्षित आदिवासी कुटुंबीयांचे फसवणूक करण्यात आली ( दि १८/५/२०२२) रोजी भिवंडी तालुक्यातील खडकी चिंभीपाडा येथील आदिवासी कुटुंबाची फसवणूक झाली कुटुंबीयांनी सदर काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आनंत वनगा यांच्याकडे तक्रार केली असता वनगा यांनी तात्काळ कुटुंबीयांना भेट देऊन झालेल्या प्रकाराचे पूर्ण माहिती घेतली सोबत नवश्या अंधेर व त्याची पत्नी मुले असून विटभट्टीवर मजुरी करुन कुटूबांचा उदारनिर्वाह करतो असे कुटुंबातील व्यक्तिने सांगितले असलेली विट सिमेंटचे बांधकाम असलेली भिंत असुन भिंतीमागे दोन एकर शेतजमीन आहे या शेतजमिनीवर सदरच्या आदिवासी कुटुंबाचे कुळ होते,परंतू या जमिनिचे मुळमालक हे मुंबईला राहतात आणि या कुटुंबाची फसवणूक करणारे दलाल वसई येथे राहतात,ही जमीन तुमच्या कुटुंबाच्या नावावर करुन देतो म्हणून सांगितले भिवंडी येथील कार्यकारीदंडाधिकारी येथे नेऊन जिथे अंगठे पाहिजेत तिथे टेकवले,व कुळ म्हणून नाव कमी केले व दलालांनी स्वतःच्या नावे शेतजमीन करुन घेतली,तसेच नवश्या अंधेर याच्या खात्यावर पाच लाख रु जमा करून पुन्हा दलालांनी ती रक्कम थोडी-थोडी करुन काढून आणायला सांगितले आणी ती रक्कम दलालांनी घेतली,आत्ता या कुटुंबाच्या पुन्हा या जमिन दलालांना सह्या-अंगठे पाहिजेत म्हणून दमदाटी व धमक्या देणे सुरु झाले आहे असे या कुटुंबाचे म्हणने आहे, कालच या भूमिहीन आदिवासी कुटुंबाने वनगा यांच्याकडे तक्रार केली असता आज या कुटुंबाच्या राहत्या घरी जावून प्रत्यक्ष पहाणी केली त्या वेळी त्या आदिवासी कुटुंबानीया अनंता वनगा यांच्या कडे न्यायाची मागणी केली त्यावेळी वनगा यांनी आदिवासी कुटुंबानीया सांगितलं की तुम्हाला न्याया मिळवून देण्यासाठी तुमच्या सोबत आहोत असे सांगितलेकुटूंबासोबत जावुन त्या दलालांविरोधात भिवंडी पोलिस स्टेशनला जावून तक्रार केली आहे