
दैनिक चालु वार्ता नीरा नरशिंहपुर प्रतिनिधी- बाळासाहेब सुतार
पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथे कैलासवासी पांडुरंग शंकर बोडके यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्त जगद्गुरु तुकाराम महाराजांचे वंशज गुरुवर्य बापूसाहेब देहुकर यांची किर्तन शेवा संपन्न झाली. नरसिंहपूर गिरवी, गारअकुले, टाकळी, बावडा, गणेशवाडी, पिंपरी बुद्रुक,टणु , गोंदी, सराटी, ओझरे, या परिसरातून आनेक भाविक भक्त टाळकरी विणेकरी मृदंगवादक हजर होते. तर कार्यक्रमा साठी प्रमुख उपस्थिती माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, पिडीसीसी बँक संचालक आप्पासाहेब जगदाळे, संचालक उदयसिंह पाटील, संचालक महादेव घाडगे, तसेच राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, वारकरी संप्रदायातील या भागातून सर्व भजनी मंडळ उपस्थित होते. यावेळी गुरुवर्य बापूसाहेब देहूकर यांनी जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या आभंगवाणी वरती चिंतन केले. व कैलास वासी पांडुरंग बोडके यांच्या आठवणींना उजाळा दिला. उपस्थित त्यांच्या परिवारातील सर्व पाहुणे मंडळी आप्तेष्ट नातेवाईक ग्रामस्थ या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. माजी उपमुख्यमंत्री श्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते ह भ प गुरुवर्य बापूसाहेब महाराज देहूकर यांचा विठ्ठलाची मूर्ती उपरणे व तुळशी हार देऊन सन्मान करण्यात आला.