
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
खुराना कंट्रॅशन कंपनीवर नागरिकांचा रोष
अमरावती :-केंद्राद्वारे उभारलेल्या अकोट-अंजनगाव सुर्जी-परतवाडा राष्ट्रीय महामार्गावर अपघाताची मालिका निरंतर असल्याचे दिसत आहे.या राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था एका वर्षांतच झालेली दिसून पडत आहे.हा महामार्ग अपघाताला आमंत्रण देणारा ठरत असून सर्व सामान्य जनतेच्या जीवावर उठलेला दिसत आहे.
शासनाकडून अंजनगाव सुर्जी-परतवाडा राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम करण्याचे कंत्राट हे खुराना कंट्रॅशन कंपनीला देण्यात आले होते.सदर कंपनीने सिमेंट काँक्रीटीकरणच्या या महामार्गाचे बांधकाम करून वाहतुकीसाठी उपलब्ध करून दिला.परंतु जेव्हापासून या रस्त्याचे बांधकाम पूर्ण झाले तेव्हापासून हा मार्ग वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला.या राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले असून जागोजागी महामार्गावर पडलेल्या मोठ-मोठया भेगा अपघातास कारणीभूत ठरत आहे.सर्वात महत्वाचे या महामार्गावर लावण्यात आलेले पथदिवे हे अजूनपर्यंत अंधारात असल्याचे दिसून येत आहे.महामार्गावर मोठ-मोठया भेगा पडलेल्यामुळे रात्रीला ये-जा करणाऱ्या नागरिकांवर हा राष्ट्रीय महामार्ग जीवावर उठल्याचे चित्र दिसत आहे.
या अपघाताच्या मालिकांमध्ये अनेक नागरिकांना आपल्या प्राणास मुकावे लागले.अपघातामध्ये मरण पावलेल्या तसेच गंभीर जखमी झालेल्या खुराना कंट्रॅशन कंपनी जबाबदार असल्याचे नागरिकांमद्धे चर्चा आहे.कारण या कंट्रॅशन कंपनीने महामार्गाचे बांधकाम करत असतांना निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून या राष्ट्रीय महामार्गाची निर्मिती केली. शासनाची दिशाभूल करून करोडो रुपयांचा मलिदा संबंधित कंट्रॅशन कंपनीने आपल्या घशात घातला तसेच या महामार्गावरील वसलेल्या गाव बस स्थानकावर प्रवाश्यांसाठी कुठल्याही प्रकारचा प्रवासी निवारा व गतिरोधक बांधकाम झाल्याचे अजून पर्यंत दिसत नाही.ह्यामुळे प्रवाश्यांची गैरसोय होतांना दिसत आहे.
शासनाच्या डोळ्यात धूळ झोकून निकृष्ट दर्जाचे काम करून शासकीय तिजोरीवर डल्ला मारणाऱ्या या संबंधित कंट्रॅशन कंपनीवर प्रशासन कारवाही का बरं करीत नाही?तसेच या बांधकाम करणाऱ्या खुराना कंट्रॅशन कंपनी व प्रशासन यांच्यामधे काही संगममत तर नाही ना?असे नागरिकांसमोर प्रश्न निर्माण होतांना दिसत आहे.
मी व माझे सहकारी रुग्णालयाच्या उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णाला तात्काळ रक्त पुरवठ्याची आवश्यकता असल्यामुळे रक्तदान कार्यासाठी आम्ही दि.१८ मे २०२२ रोजी रात्री ९:३० सुमारास निघलो परंतु जात असतांना महामार्गाचे निकृष्ट दर्जा कामाच्या पडलेल्या तडामुळे आमचा स्वतःचा खुराना कंट्रॅशनीने रक्त पिण्याचे काम केले.
अमोल बरडे
शाखाद्यक्ष,राष्ट्रीय चर्मकार महासंघ
नॅशनल हायवे अथोरिटी ऑफ इंडिया यांचे ध्येय अपघात विरहित व सुरक्षित प्रवासासाठी रस्ते निर्मितीचा आहे परंतु याच्या विपरीत अकोट ते अंजनगाव आणि बहिरम पर्यंत या रोडचा सर्वे केला असता शेकडो ठिकाणी रस्त्याला तडे गेलेले आहेत अनेक ठिकाणी हा रस्ता दबलेला आहे यावरून या कामाचा निकृष्ट दर्जा दिसून येतो तीन वर्षाचा लायबिलिटी पिरेड पूर्ण व्हायच्या आधीच जर ही अवस्था असेल तर भविष्यात परिस्थिती आणखी बिकट होईल या अशा रस्त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे प्राणहानी आणि वित्तहानी होत आहे याला सर्वस्वी जबाबदार खुराना कंट्रक्शन कंपनी आणि त्याला वरदहस्त देणारे नॅशनल हायवे अथोरिटी ऑफ इंडियाचे अभियंता आणि अधिकारी जबाबदार आहे याबाबतीत लवकरच केंद्रीय कार्यालयात संपूर्ण पुराव्यांची तक्रार दाखल करणार आहे.
विनीत डोंगरदिवे
अध्यक्ष, डेव्हलपमेंट फंड सुपर व्हिजन कमिटी.