
दैनिक चालु वार्ता शिरपूर प्रतिनिधी:- महेंद्र ढिवरे
17/05/2022 मंगळवार रोजी कौशल्य विकास सोसायटी महाराष्ट्र शासन व युथ एड फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने होणाऱ्या उद्यमिता यात्रा धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे प्रारंभ झाली. प्रत्येक यात्रेतून जिल्ह्यातील 100 नवं उद्योजकांना उद्योगासाठी मदत केली जाणार असून विविध शासकीय योजनांची माहिती देखील या कालावधीत दिली जाणार आहे. या तीन दिवसांच्या प्रशिक्षणानंतर तब्बल सहा महिने युथ एड फाऊंडेशन ची मंडळी या नवउद्योजकांना मार्गदर्शन करणार आहे. हा कार्यक्रम शिरपूर तालुक्यातील पंचायत समिती येथे सुरू झाला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून कौशल्य विभागाचे सह आयुक्त राजू वाकळे साहेब युथ एड फाउंडेशन चे संस्थापक मॅथ्यू मत्तम तसेच नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी अशोक कुमार मेघवाल,कौशल्य विभागाचे कर्मचारी तेजपाल गिरासे यांच्याकडून उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी ही उद्यमिता यात्रा ची पूर्ण मंडळी शिरपूर तालुक्यामध्ये आली होती . पूर्ण राज्य उद्यमिता यात्रा समन्वयक म्हणून जबाबदारी पार पाडणारे मनोज भोसले यांनी नवं उद्योजकांना मार्गदर्शन केले. धुळे जिल्ह्याची जबाबदारी उद्यमिता यात्रा समन्वय जितेंद्र राठोड यांनी पाहिली तर स्वयंसेवक म्हणून सागर चव्हाण, कृष्णा जाधव ,राहुल राठोड पृथ्वीराज बंजारा आदींनी मेहनत घेतले. या उद्यमिता यात्रा निमित्त यूथ एड फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मॅथ्यू मत्तम यांनी इंजिनिअरिंग कॉलेज(आर सी पटेल, इंजिनिअरिंग कॉलेज शिरपूर) येथील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सहाय्यक आयुक्त राजू वाकळे साहेब यांनी आणि जिल्हा युवा अधिकारी अशोक कुमार मेघवाल यांनी देखील न उद्योजक होऊ इच्छिनाऱ्या लोकांना मार्गदर्शन केले.