
दैनिक चालु वार्ता गंगापूर प्रतिनिधी -सुनिल झिंजूर्डे पाटिल
गोड ऊसाची कडू कहाणी..
दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षी ही मोठ्या आशेने ऊसाची लागवड शेतकऱ्यांनी केली.परंतु ऊसाने अक्षरश: कडू पणा आणला आहे.ऊस कधी तुटून जातो म्हणून शेतकरी वणवण फिरताना दिसत आहे.रोज मजुराकडे,टोळी मुकरदम,कारखाना यांकडे चकरा मारत आहे.काही शेतकरी स्वतः मजूर बघून अधिक खर्च करून ऊस कारखान्याला पाठवत आहे.काही शेतकरी तर अजुन ही चिंतेत आहे.अधिक पैसा खर्च करून किंवा देऊनही उसाला तोडणी मिळत नाही हे.यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे..
गंगापूर – आपला देश कृषि प्रधान मानला जातो.फक्त मानला जातोच का? होय खर आहे.एकीकडे महागाई ने अफाट गगनभरारी घेतली.यात सर्वसामान्य नागरिक चांगलाच होरपळून निघत आहे.तर दुसरीकडे शेतकऱ्यांना घाम गाळुन भरपूर कष्ट,खर्च करून शेतात पिकवलेल्या कांद्याला भावाच नाही तर एक पीक म्हणजेच गोड उस कडू पणा दाखवत अजुन ही जशाच तसा शेतात उभा आहे.यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे शेतकऱ्याला “वाली”कोन अशी गत सध्या झाली आहे. गावात फक्त युवा नेते,शेतकरी नेते नावालाच आहेत का? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडत आहे.गळीप हंगाम संपत आळा तरी अनेक उस शेतात तसेच उभे ना उभे आहेत.
शेतकरी सकाळ उठल्यापासून तर झोपेपर्यंत उस आणि कांदे याचेच चिंताजनक प्रश्न त्याला पडत आहे.करावे तरी काय! आज कांदा बघितला तर अफाट खर्च करूनही खर्च निघत नाही.कांदा साचून ठेवायचा तर त्याला ही खर्चच खर्च.कांदा चाळ मधे कांदा साचून ठेवला जातो.साचून ठेवल्याने उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट होत असते.पंरतु कांदा टिकतो का?नाही याची पण शाश्वती धरता येत नाही.कांदा जास्त दिवस राहिल्याने सडतो.हे सर्व शेतकरी सहन करून चांगला कांदा बाजूला काढून विक्री साठी काढला जातो.पुढे भाव मिळेल का?नाही हे सांगता येत नाही.म्हणजे सर्व राम भरोसे. जिल्ह्याच्या बऱ्याच भागात शेतकरी कांदा पिकाची लागवड करत असतात.कांद्याला देशभरातून मागणी असल्याने चांगला भाव मिळून उत्पन्न चांगले मिळण्याची शेतकऱ्यांना खुप आशा असते पण कांद्याला योग्य दर न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी नीराशा होत असते.वर्षभर कधीपण बेमोसमी अवकाळी पाऊस,गारपीट,दुष्काळ अशा अनेक समस्यांना शेतकऱ्याला तोंड द्यावे लागते,अशाही परिस्थितीतीत संघर्ष करता,न डगमगता शेतकरी मोठ्या कष्टाने शेतीवर रात्रंंदिवस मेहनत करून शेती फुलवतो, मात्र कवडीमोल दरात शेतमाल विकावा लागतो तेव्हा त्याच्या कष्टावर पाणी फिरले जाते.जर असेच असले तर शेतकरी कर्जबाजारी झाल्या शिवाय राहणार नाही.त्यामुळे केंद्र व राज्य सरकारने या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्याची गरज आहे..