
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- संभाजी गोसावी
सातारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अनेक छोटे-मोठे गुन्ह्यांचा शोध सातारा शहर पोलीस व डी बी पथकांचे पोलिस कर्मचारी नेहमीच सतर्क असल्यांचे दिसून आहे सातारा शहर पोलीस व डी.बी पथकांतील पोलिस कर्मचाऱ्यांकडून अनेक गुन्ह्यांचा शोध घेऊन गुन्हे उघडकींस आणण्यांस पोलिस नेहमी सतर्क असतात. याप्रकरणी एका सराईत गुन्हेगारांकडूंन दुचाकी चोरी प्रकरणी सातारा शहर पोलीस आणि डी बी पथकांचे पोलिस कर्मचाऱ्यांनी मोटारसायकल चोरीप्रकरणी अट्टल चोरट्यांस गजाआड करुन त्याच्याकडूंन तीन मोटारसायकली हस्तगत करण्यांत पोलिसांना यश मिळाले. त्याच्याकडूंन अन्य ठिकाणाहून मोटरसायकल चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. यापूर्वीही चोरीचे गुन्हे दाखल झाले असून त्याच्याकडूंन आणखीन काही गुन्हे उघडकीस येण्यांची दाट शक्यता आहे. राजाराम लोहार वय 35 मूळ रा. आंबेवदे बुद्रुक ता.सातारा सध्या रा. सोमवार पेठ सातारा असे अटक करण्यांत आलेल्या आरोपीचे नाव आहे. सदराची कामगिरी पोलीस अधीक्षक मा.अजयकुमार बन्संल अप्पर पोलीस अधीक्षक मा .अजित बोहाडे सहाय्यक पोलीस अधीक्षक श्रीमती.आँचल दलाल मॅडम सातारा शहर पोलीस ठाण्यांचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर सहाय्यक पोलीस निरीक्षक वंदना श्रीसुंदरा मॅडम त्यांच्या मार्गदर्शनाखांली गुन्हे प्रकटीकरण पथकांतील पोलिस उपनिरीक्षक सुधीर मोरे सुजित भोसले ,अविनाश चव्हाण ,पंकज डहाणे अभय साबळे, विशाल धुमाळ आदी पोलिस कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला