
दैनिक चालू वार्ता वाडा तालुका प्रतिनिधी- मनिषा भालेराव
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
वाडा तालुक्यातीलपिंपळास ग्राम पंचायत मधील वाकडे पाडा,वाघात पाडा येथील आदिवासी गोरगरीब कुटुंबाच्या कच्च्या घरांचा सर्वे करुन घरकुलाचा लाभ देण्यात यावा अशी मागणी (दि १९ हे)रोजी गट विकास अधिकारी पंचायत समिती वाडा यांना निवेदन देण्यात आलेआदिवासी मुक्ती मोर्चा सामाजिक संघटनेच्या पिंपळास गाव कमिटीच्या वतीने गटविकास अधिकारी पंचायत समिती वाडा यांना करणेत आली त्यावेळी अध्यक्ष अनंता वनगा,वाडा तालुका कमिटी अध्यक्ष दयानंद हारळ,वाडा तालुका उपसचिव मुकेश वाकडे,माजी सभापती योगेश गवा व पिंपळास गावकमिटी सदस्य व इतर मान्यवर उपस्थित होते