दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी-गोविंद पवार
त्रंबकेश्वर येथील श्री स्वामी समर्थ गुरुपीठ व प पू गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या विषयी बेकायदेशीर रित्या बदनामी करणाऱ्या तक्रारी सोशल मीडियाच्या माध्यमातून झळकत आहेत. त्यामुळे सेवेकर्यांच्या भावना दुखावल्या मूळे सेवेकरी यांनी पोलीस निरीक्षक संतोष जी तांबे साहेब यांनी दुष्ट वृत्तीच्या लोकांना तात्काळ अटक करण्यासाठी सेवेकरी मार्फत निवेदन देण्यात आले.
आज प पू गुरुमाऊलींच्या देखरेखीखाली माध्यमातून 18 कार्य विभागाच्या चालू आहे. बालसंस्कारविभाग, प्रश्नउत्तर विभाग, युवा प्रबोधन विभाग, आरोग्य आयुर्वेद विभाग, कृषी शास्त्र विभाग विवाह संस्कारविभाग, गर्भसंस्कार व पालकत्व विभाग, विविध प्रशिक्षण विभाग, वास्तू शास्त्र विभाग, भारतीय संस्कृती व मराठी अस्मिता विभाग, आय टी विभाग, पर्यावरण प्रकृती विभाग, भारतीय पशू
गोवंश विभाग, स्वयंरोजगर विभाग, माहिती तंत्रज्ञान विभाग, देश विदेश अभियान विभाग, वेद विज्ञान संशोधन विभाग, प्रशासकीय विभाग या 18 विभागाच्या माध्यमातून हे विश्वसतरीय महान कार्य आज अविरत पणे चालू आहे. या मार्गाच्या माध्यमातून दुष्काळी परिस्थिती मध्ये कपडे, अन्नधान्य वाटप करण्यात आलेले आहे.
कोविड १९ मध्ये गुरुपीठांने आपले भक्त निवास पयली आणी दुसरी लाट मध्ये निःशुल्क महाराष्ट्र शासनाच्या विना शर्त स्वाधीन केले होते. नुसते स्वाधीन नाही तर
त्यासोबत चेक द्वारे आदरणीय दादासाहेब यांनी काही निधी देण्यात आला होता.
विविध केंद्राच्या माध्यमातून असे प्रत्येक केंद्राच्या माध्यमातून उपक्रम घेतले जातात. एवढे सर्व करून जर असे मनोवृत्ती बिघडलेले लोक आरोप प्रत्यारोप करत असतील तर त्यांना योग्य वेळी त्यांची जागा दाखवून अमर रघुनाथ पाटील रा पुणे व चा चंद्रकांत गणपत पाठक रा. त्रंबकेश्वर यांना तात्काळ अटक करण्यात व्हावी अशी महाराष्ट्र व महाराष्ट्र बाहेरून सेवेकरी यांची मागणी जोर धरत आहे.
